निगडाळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सांगता समारंभ संपन्न


आंबेगाव -मोसीन काठेवाडी

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभ निमित्ताने निगडाळे(ता.आंबेगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस अँड्रॉईड स्मार्ट टी.व्ही,ऑफिस व्हील चेअर,सिलिंग फॅन व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

सुरुवातीला ग्रामपंचायत कार्यालयात ध्वजपूजन उपसरपंच नितीन लोहकरे,ग्रामसेवक मंगेश जोशी,ग्रामपंचायत सदस्या सुरेखा लोहकरे व ध्वजारोहन सरपंच सविता कोकाटे आणि प्राथमिक शाळेत ध्वजपूजन मुख्याध्यपिका शोभा जाधव,अंगणवाडी सेविका नंदाबाई लोहकरे व ध्वजारोहन शरद बँकेचे संचालक मारुती लोहकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी गायलेल्या ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताने झाली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भीमाशंकर अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी वसंत चव्हाण होते.यावेळी सेवानिवृत्त मुख्याध्यापक बबन कोंढावळे,वनसमिती अध्यक्षा अनिता लोहकरे,वनपरिमंडळ अधिकारी नारायण गिऱ्हे,वनरक्षक सागर होले,वनरक्षक गुलाब गोरे,ग्रामपंचायत सदस्य नामदेव कोंढवळे,सविता दाते,चिमाजी पारधी,काळू कुऱ्हाडे,सोमा कुऱ्हाडे,पांडुरंग कुऱ्हाडे,अरुण लोहकरे,सोपान कोंढवळे,मारुती भवारी उपस्थित होते.

याप्रसंगी ग्रामपरिस्थितीकी विकास समिती निगडाळेकडून एक अँड्रॉईड स्मार्ट टी.व्ही,हिंजवडी(पुणे) येथील पर्सिस्टन्ट सिस्टीम लिमिटेडच्या सामाजिक दायित्व निधीतून व असिस्टन्ट जनरल मॅनेजर विद्याधर पुरंदरे,असोसिएट मॅनेजर प्रविण परीट,पिंपळे गुरव येथील सामाजिक कार्यकर्ते राहुल जवळकर यांच्या सहकार्यातून पाच ऑफिस व्हील चेअर,सेवानिवृत्त पशुवैद्यकीय कर्मचारी चिमाजी पारधी यांजकडून दुरेघी,चाररेघी व चौकटी वह्या,पेन,पेन्सीली,चित्रकला वह्या,रंगीत तेलखडू बॉक्स,खोडरबर,शॉपनर आणि कमलजामाता क्रिकेट क्लब भीमाशंकर-निगडाळेकडून तीन सिलिंग फॅनचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना वनपरिक्षेत्र अधिकारी वसंत चव्हाण म्हणाले, “आदिवासी विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन उज्ज्वल भविष्य घडवावे.ग्रामपरिस्थितीकी विकास समितीकडून शालेय एका वर्गखोलीचे बांधकाम करून देण्यात येईल.काम दर्जेदार व गुणवत्तापूर्ण होण्यासाठी शिक्षक व ग्रामस्थांनी लक्ष द्यावे”.
कार्यक्रमाचे संयोजन सचिन कुऱ्हाडे,सुनिल कुऱ्हाडे,तुषार गेंगजे,उमेश लोहकरे,रामदास कुऱ्हाडे,अंकुश लोहकरे,स्वप्निल अस्वले,वंदना गेंगजे यांनी केले.प्रास्ताविक शिक्षक संतोष थोरात यांनी केले व आभार उपसरपंच नितीन लोहकरे यांनी मानले.खाऊ वाटप करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

Previous articleसमाजातील सर्व घटकांनी आणे पठार भागात चारा उपलब्ध करून द्यावा – तहसीलदार सबनीस
Next articleएकाला लिफ्ट घेणे पडले महागात ! चोरट्यांनी मारहाण करत लुटले, यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल