पत्रकार संदीप महाजन यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी भारतीय पत्रकार संघ दौंड तालुका व पुणे जिल्हा यांच्याकडून दौंड पोलीस स्टेशन यांना कडक कारवाई व्हावी यासाठी निवेदन

 

कुरकुंभ ,सुरेश बागल

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील गुंड प्रवृत्तीचे आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार संदीप महाजन यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांनी पत्रकार महाजन यांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी आत्तापर्यंत कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल केला नाही याकडे प्रशासनाची दुर्लक्ष आहे. पत्रकार संदीप महाजन व त्यांच्या कुटुंबीयांना आमदार किशोर पाटील यांच्याकडून जीवाला धोका निर्माण झाला आहे.

 

आमदार किशोर पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि पत्रकार संदीप महाजन व त्यांच्या कुटुंबीयांना पोलीस संरक्षण मिळावे प्रशासनाने दखल घेऊन लवकरात लवकर कारवाई न केल्यास दौंड तालुका व पुणे जिल्हा भारतीय पत्रकार संघाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा भारतीय पत्रकार संघाचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र सोनवलकर आणि दौंड तालुक्यातील भारतीय पत्रकार संघातील सदस्य विकी ओहोळ ,संदीप बारटक्के आणि तालुक्यातील अन्य पत्रकारांनी केला आहे. दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले. असा उल्लेख निवेदनामध्ये केलेला आहे.

Previous articleदौंड तालुक्यात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा
Next articleटिळेकरवाडी येथे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने वृक्षारोपण