टिळेकरवाडी येथे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने वृक्षारोपण

उरुळी कांचन

पूर्व हवेली तालुक्यातील ग्रामपंचायत टिळेकरवाडी व जिल्हा परीषद प्राथमिक शाळा टिळेकरवाडी यांच्या वतीने स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने ग्रामपंचायत टिळेकरवाडीचा ध्वजारोहण सरपंच सुभाष इंद्रभान लोणकर यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच शिलाफलक अनावरण करणे, जि. प. शाळा प्रभातफेरी, कवायत, भाषणे , मान्यवर भाषणे, लहान मुलाना खाऊ वाटप, गावातील १२ वी पास झालेल्या विद्यार्थ्याना सन्मान चिन्ह वाटप, सॅनेटरी नॅपकिन मशीन उद्धघाटन, वृक्षारोपण चा कार्यक्रम घेण्यात आले.

यावेळेस कार्यक्रमाचे अध्यक्ष आय. पी. एम. टी मॅनेजिंग डायरेक्टर डॉ कमलेश मोरे, व त्यांचे सहकारी तसेच प्रमुख पाहुणे म्हणून रिसर्च डायरेक्टर बायफ संस्था जयंत खडसे, त्यांचे सहकारी, माजी सैनिक रघुनाथ आण्णा टिळेकर, ग्रा. पं. टिळेकरवाडीचे सरपंच सुभाष लोणकर, उपसरपंच नंदा राऊत, सदस्य गणेश टिळेकर, गोवर्धन टिळेकर, सुशील राऊत, कल्पना टिळेकर, सुषमा टिळेकर, वैशाली चौरे, श्री.दत्त सेवा ट्रस्टचे अध्यक्ष संतोष बापू टिळेकर, लक्ष्मण टिळेकर , सुभाष ल.टिळेकर, राजेंद्र ला.टिळेकर, पोलिस पाटील विजय टिळेकर ,तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष टिळेकर, उपाध्यक्ष कालिदास झगडे, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष महेश कादबाने व समितीचे उपाध्यक्ष व सदस्य, शाळेचे मुख्याध्यपक गायकवाड सर, शिक्षिका गांजाळे मॅडम, अंगणवाडी भालेराव मॅडम, आणि गावातील सर्व आदरणीय मान्यवर ग्रामस्थ बंधु-भगिनी, तरुण कार्यकर्ते व सर्व विद्यार्थी मित्र तसेच समस्थ ग्रामस्थ टिळेकर वाडी हे सर्व जन कार्यक्रमांस उपस्थित होते. सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक, समस्थ ग्रामस्थ टिळेकरवाडीचे मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleपत्रकार संदीप महाजन यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी भारतीय पत्रकार संघ दौंड तालुका व पुणे जिल्हा यांच्याकडून दौंड पोलीस स्टेशन यांना कडक कारवाई व्हावी यासाठी निवेदन
Next articleइंद्रधनू ग्रुपच्या वतीने शेतकऱ्यांना आंबा, अंजीर रोपांचे वाटप