दौंड तालुक्यात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा

सुरेश बागल

दौंड तालुक्यातील कुरकुंभ, पांढरेवाडी, मळद ,रावणगाव, जिरेगाव या ठिकाणी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.१५ ऑगस्ट दिनानिमित्त द सायन्शिआ स्कूल जिरेगांव या ठिकाणी बाल विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. या दिनानिमित्त बालविद्यार्थ्यानी विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी,परेड,पिरामिड, तसेच स्वच्छ भारत सुंदर भारत, झाडे लावा झाडे जगवा व एकमेका सहाय्य करू , या वेगवेगळ्या विषयावर नाटिका सादर करण्यात आल्या. तसेच भारताच्या स्वातंत्र्यांमध्ये ज्यांनी प्राणाची आहुती दिली त्यांच्या आठवणींना उजाळा देऊन भगतसिंग सुखदेव व राजगुरू या देशभक्तांची स्वतंत्र दिनानिमित्त आठवण यावी म्हणून परेडच्या कार्यक्रमांमध्ये दाखवण्यात आले.

या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख अतिथी युवा उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते श्री.विजय जाधव साहेब , यांनी शाळेच्या मुलांना दत्तक घेऊन गोरगरीब मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे व समाजातील प्रत्येक घटकातील मुलांनी शिक्षण घेउन देशाची सेवा करावी असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमानिमित्त संस्थेचे अध्यक्ष अमोल मोरे यांनी ज्ञान, विज्ञान, कौशल्य व विकास या पैलूवर आधारित शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येत आहे असे प्रतिपादन केले. याप्रसंगी सुनिता फाउंडेशन संस्थेचे संस्थापक श्री. नवनाथ सातपुते अध्यक्ष अमोल मोरे , श्वेता मोरे दिलीप सातपुते, धनंजय सातपुते, चंद्रकांत जाधव, विशाल जाधव, सचिन खेत्रे तसेच सर्व पालक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली शितोळे व समृतिका नगराळे व आभार संतोषी साळुंके व अनुजा जाधव यांनी केले.

Previous articleहिवरे तर्फे नारायणगाव येथे बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश
Next articleपत्रकार संदीप महाजन यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी भारतीय पत्रकार संघ दौंड तालुका व पुणे जिल्हा यांच्याकडून दौंड पोलीस स्टेशन यांना कडक कारवाई व्हावी यासाठी निवेदन