पाटस ग्रामविकास फाउंडेशनचे आरोग्य अभियान

योगेश राऊत, पाटस

वाढते प्रदूषण, कॉम्प्युटर, मोबाईलचा वाढता वापर यामुळे मानसाचा वाढता स्क्रीन टाईम लक्षात घेता डोळ्यांचे आरोग्य सध्या धोक्यात आले आहे या कारणास्तव पाटस ग्रामविकास फाउंडेशनच्या आरोग्य अभियाना अंतर्गत मोफत नेत्र तपासणी शिबिराचे सर्व वयोगटातील नागरिकांसाठी आयोजन दौंड तालुक्यातील पाटस येथे सोमवार ( दि.10) रोजी करण्यात आले होते .या शिबिराचा 514 नेत्र रुग्णांनी लाभ घेतला त्यातील 26 नेत्र रुग्णांची शस्त्रक्रियेसाठी नोंदणी करण्यात आली यातील 16 शस्त्रक्रिया या गरजू रुग्णांकरिता संपूर्णपणे मोफत होणार आहेत, नागेश्वर विद्यालयातील दहावीतील 72 विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली ,रुग्णांना मोफत आयड्रॉप्स चे वाटप करण्यात आले, शिबिरास महिलांचा सहभाग लक्षणीय होता आरोग्य अभियाना अंतर्गत विविध शिबिरे आयोजित करण्याचा फाउंडेशन चा मानस आहे.

शिबिरासाठी आप्पासाहेब पवार, नामदेव शितोळे ,मनोज फडतरे, शिवाजी ढमाले, रंजना पोळेकर, सायराबानू शेख ,मधुकर आव्हाड, प्रशांत खरात, विश्वास अवचट ,प्रताप भागवत, नवनाथ साळुंखे,विजय सोनवणे,रमेश जाधव, संजय रासकर,बाळासो चव्हाण,बाळासो नानवर,मिथुन शितोळे,उत्तम रुपनवर भरत लोखंडे,संजय देशमाने यांनी उपस्थिती दर्शविली शिबिरासाठी पुना आय केअर प्रा.लि. पुणे डॉ नितीन कोलते व सर्व टीम चे सहकार्य लाभले पाटस ग्रामविकास फाउंडेशनचे पदाधिकारी विनोद कुरुमकर, हर्षद बंदिष्टी, प्रमोद ढमाले, गौतम पानसरे ,राज मुलाणी,नवनाथ सोनवणे, सार्थक मोरे,रवींद्र शाळू यांचे योगदान लाभले

Previous articleज्योती क्रांती को – ऑप.क्रेडिट सो. लिमिटेडचा ९ वा वर्धापन दिन दौंड शाखेत मोठ्या उत्साहात साजरा
Next articleशारदा ग्रुप तर्फे राष्ट्रीय माथाडी कामगार व जनरल विभाग दौंड तालुका उपाध्यक्ष अमोल कुलंगे यांचा सत्कार