शारदा ग्रुप तर्फे राष्ट्रीय माथाडी कामगार व जनरल विभाग दौंड तालुका उपाध्यक्ष अमोल कुलंगे यांचा सत्कार

कुरकुंभ : सुरेश बागल

पांढरेवाडी (ता.दौंड) च्या जवळीक असणारे शारदा नगर येथील रहिवासी व माथाडी कामगार व जनरल विभाग दौंड तालुका उपाध्यक्ष अमोल कुलंगे यांचा (दि .१३) गुरुवार रोजी रात्री ८:०० वा.शारदा ग्रुप तर्फे गणपती मंदिर येथे पुष्पगुच्छ व फेटा घालून सत्कार करण्यात आला. मागील आठ दिवसांपूर्वी कुलंगे यांची दौंड तालुका माथाडी कामगार उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. सत्कार झाल्यानंतर माझ्या शारदानगर कुटुंबाकडून जो मला मान सन्मान दिला त्याबद्दल मी सर्वांचा मनापासून ऋणी आहे आपण सर्वजण माझी ताकद आहात .नेहमीच सर्वजण माझ्या मागे  उभे राहिलात पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार मानतो.

दौंड तालुक्यातील व कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी मी सदैव प्रयत्न करेन. यावेळी पांढरवाडी गावचे पोलीस पाटील विलास येचकर , शारदानगरचे नवनाथ जगताप, संतोष पिसाळ, सुनील गोरे ,अंबादास काळे ,शिवाजी काळे ,रंगनाथ जाधव ,रवींद्र जाधव ,दादा पारसे, झाकणे ऋषी शितोळे, संजय पवार ,मारुती पतळे, ओमकार काळे, पत्रकार सुरेश बागल आणि अन्य नागरिक उपस्थित होते.

Previous articleपाटस ग्रामविकास फाउंडेशनचे आरोग्य अभियान
Next articleवीज ऊद्योगातील कंत्राटी कामगारांच्या करिता स्वतंत्र शेड्युल नुसार सुधारित वेतन दर लागु करावेत : महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघांची मागणी