ज्योती क्रांती को – ऑप.क्रेडिट सो. लिमिटेडचा ९ वा वर्धापन दिन दौंड शाखेत मोठ्या उत्साहात साजरा

योगेश राऊत ,पाटस

ज्योती क्रांती को – ऑप.क्रेडिट सो. लिमिटेड चा ९ वा वर्धापन दिन दौंड शाखेत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आणि गुणवंत विध्यार्थी यांना बक्षीस वाटप कार्यक्रम अत्यंत छान प्रकारे पार पडला.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सल्लागार मंडळ यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करण्यात आले. प्राध्यापक महेश पांडुरंग देशमाने तसेच सहकारी प्रा.ज्ञानेश्वर कडू यांच्या उपस्थितीत सर्व शालेय विद्यार्थ्यांचे सत्कार समारंभ करण्यात आले. अन्य मान्यवर, कर्मचारी वर्ग, एजंट,आणि सभासद, विद्यार्थी आणि त्यांचे पालक मोठया संख्येने उपस्थित होते.

सर्व उपस्थित मान्यवरांसाठी चहा नाष्टा असा अल्पहारची सोय करण्यात आली होती.तसेच वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने दोन लाखाची ठेव पावती करण्यात आली. अशाप्रकारे कार्यक्रम व्यवस्थित रित्या पार पडला.

दौंड शाखेतील मॅनेजर साळवे भाऊसाहेब राजेंद्र, कॅशिअर काची अनिता दिगांबर ,क्लर्क काची मनीषा सागर, एजंट काची सागर , दै.प्रेरक कांबळे अंजली ह्या सर्व कर्मचारी व्यक्तींनी वर्धापन दिनानिमित्त फक्त पगारासाठी कार्य हा उद्देश डोळ्यासमोर न ठेवता नवीन नवीन असे प्रोत्साहनपर उपक्रम हाती घेत असतात.ही सहकारी संस्था सर्वसामान्यांसाठी खूप मोठ्या प्रमाणात आर्थसहाय्य सहज,सुलभ रीतीने आणि लवकरात लवकर देण्याच प्रयत्न करण्याचे प्रयत्न करते.ग्राहकांना त्यांची स्वतःची बँक मनुन विश्वास वाटतो व त्याचे कौतुक ह्या दौंड शाखेतील कर्मचारी यांना क्रेडिट आलेले सभासद देत होत.

दौंड तालुक्यातील विविध भागातील शिक्षण संस्थेतील विध्यार्थी यांचा सहभाग होता.त्यातिलच देऊळगाव राजे येथील सिद्धेश्वर माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनी राधा खराडे,साक्षी खुळे,विध्यार्थी दरक्षण गोरे सोणवडी च्या आश्रम शाळेतील भैरवनाथ विद्यालय मधील कु.अनुष्का लोखंडे इतर सर्व असे पंधरा सोळा विद्यार्थ्यांचा गुण गौरवकरण्यात आला.

ह्या सहकारी संस्थेच्या शाखा ऐकून ४८ असून ग्राहक सेवा केंद्र ६० आहेत,बचत गट ५००० असून २ लाख समाधानी ग्राहक आहेत.अशी ऐकंदरीत प्रगती बँकेची असून इथून पुढेही ग्राहकांना त्यांच्यासाठी नवीन सेवा सुविधा भविष्यात केले जातील असाही प्रयत्न संस्थेचा आहे. संस्थेचे चेअरमन अजिनाथ हजारे असून त्यांनीही दौंड च्या शाखेच्या ९ वर्धापन दिनानमित्त फोन करून शुभेच्छा दिल्या.

Previous articleछगन भुजबळ यांची आमदार अतुल बेनके यांच्या निवासस्थानी भेट
Next articleपाटस ग्रामविकास फाउंडेशनचे आरोग्य अभियान