छगन भुजबळ यांची आमदार अतुल बेनके यांच्या निवासस्थानी भेट

नारायणगाव, किरण वाजगे

राजकारणात कुठे आणि कधी थांबायचं हे ज्याचे त्याला कळले पाहिजे माझा पुतण्या ज्यावेळेस मला म्हणेल की राजकारण सोडून आता तुम्ही घरी बसा त्यावेळेस मी नक्की त्याचे ऐकेल, असा टोला कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी नारायणगाव येथे लगावला.

जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी केंद्रीय मंत्री शरद पवार किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर न जाता तटस्थ राहण्याची भूमिका घेतली असल्याचे जाहीर केल्यानंतर गेली दोन दिवस अनेक चर्चांना उधान आले असताना आज कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी थेट आमदार अतुल बेनके यांच्या निवासस्थानी भेट दिली.

जुन्नर तालुक्यात आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ आमदार अतुल बेनके यांच्या निवासस्थानी आले. माजी आमदार वल्लभ बेनके यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी ते उपस्थित राहिले असल्याचे जरी बोलले जात असले तरी, नक्कीच यामागे काहीतरी राजकीय खलबते झाली असावीत अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगली होती.
यावेळी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली.

येवला येथे नुकतीच शरद पवार यांच्या सभेत, ‘छगन भुजबळ यांना येथून उमेदवारी देऊन चूक केली’ असा प्रश्न विचारला असता त्यावर भुजबळ यांनी खोचक शब्दात टीका करत पवार साहेबांनी चूक करून या भागाचा विकास झाला असल्याचा टोला लगावला. याबरोबरच तुमच्या अतिशय जवळ असलेले विश्वासू सहकारी तसेच तुमचा पुतण्या अजित पवार, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, प्रफुल्ल पटेल हे नेते आज का दुरावले असा प्रश्न उपस्थित केला. गोंदिया पासून कोल्हापूर पर्यंत आणि पुण्यापासून संभाजीनगर, लातूर मराठवाड्यापर्यंत तुमचे विश्वासू सहकारी का सोडून गेले असेही छगन भुजबळ यांनी म्हटले. आमदार अतुल बेनके यांना तुम्ही काही राजकीय सल्ला दिला आहे का यावर ते म्हटले असा सल्ला एक मिनिटात देता येत नाही माजी आमदार वल्लभ बेनके व त्यांच्या कुटुंबाची माझे प्रेमाचे संबंध असल्यामुळे मी येथे आलो.

याप्रसंगी कृषिरत्न अनिल तात्या मेहेर, आमदार अतुल बेनके, रोहिदास केदारी, बाळा सदाकाळ, अमित बेनके, प्रकाश पाटे, तानाजी डेरे, मामासाहेब हांडे,राजू कोल्हे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Previous articleभारतीय जनता पार्टीच्या वतीने छगन भुजबळ यांचे नारायणगावात उत्साहात स्वागत
Next articleज्योती क्रांती को – ऑप.क्रेडिट सो. लिमिटेडचा ९ वा वर्धापन दिन दौंड शाखेत मोठ्या उत्साहात साजरा