भारतीय जनता पार्टीच्या वतीने छगन भुजबळ यांचे नारायणगावात उत्साहात स्वागत

नारायणगाव :- (किरण वाजगे)

राष्ट्रवादी काँग्रेस चे ज्येष्ठ नेते व विद्यमान कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ हे नाशिक वरून पुण्याकडे जात असताना जुन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांचे नारायणगावात उत्साहात स्वागत करण्यात आले जुन्नर तालुका भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष संतोषनाना खैरे व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांना पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.

याप्रसंगी भाजपचे पदाधिकारी आशिष माळवदकर, एडवोकेट राजेंद्र कोल्हे, दिलीप गांजाळे, सरपंच राजेंद्र मेहेर, सरपंच अमोल भुजबळ, डॉ पंजाब कथे, अशोक दरेकर, रमेश वायकर, मनिषा पारेकर, शरद दरेकर, किशोर पोखरणा, अशोक पाटे, रामभाऊ तोडकरी, बाळासाहेब भुजबळ, आत्माराम संते, प्रणव पाटे, अमित औटी, अक्षय डोके, महेंद्र कोल्हे, गणेश शिंदे, अक्षय खैरे, सोपान खैरे, मनोज वामन, माणिक मावळे आदी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान जुन्नर तालुका समता परिषदेच्या वतीने देखील भुजबळ यांचा विशेष सन्मान करण्यात आला यावेळी फेवरेट मंत्री भुजबळ यांनी नारायणगाव बस स्थानक आवारात उपस्थितांना संबोधित केले. मुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आपण सत्तेमध्ये कशाप्रकारे सहभागी झालो याविषयी त्यांनी उपस्थितांना माहिती दिली. तालुकाध्यक्ष संतोष नाना खैरे, आशिष माळवदकर यांनी त्यांचे स्वागत पर मनोगत व्यक्त केले.

Previous articleशरद पवार व अजित पवार माझ्या हृदयात; राष्ट्रवादी पक्ष फुटीच्या मुद्यावर आमदार अतुल बेनके यांची तटस्थ भूमिका
Next articleछगन भुजबळ यांची आमदार अतुल बेनके यांच्या निवासस्थानी भेट