घोडेगाव स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्साहात संपन्न


घोडेगाव – मोसीन काठेवाडी

घोडेगाव (ता आंबेगाव) भवानीमाळ येथे गुरु मेरी पुजा गुरु मेरा स्वामी ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुपौर्णिमा उत्साहात संपन्न झाली.श्री स्वामी समर्थ गजराने सर्व परिसर धुमधुमून गेला होता आई गुरु माऊलीच्या भेटी साठी सेवेकरी भक्ती मध्ये लिन होऊन गेले होते.सकाळी ८ते ९ होम हवण सामुदायिक स्वामी समर्थ सारामृत २१ अध्याय पठण करण्यात आले.सामुदायिक मंत्र पठण व १०:३०वा आरती झाली व दर्शन घेण्यात आले

दु १२ते१:००महाप्रसाद व खिचडी वाटप करण्यात आले
यावेळी ५००महिला,पुरुष सेवेकऱ्यांनी स्वामी समर्थ चरणी सेवा अनंतजन्मीच्या महापुण्याईने स्वामीचरणी नतमस्तक होण्याचे भाग्य घोडेगाव पंचक्रोशीतील सेवेकऱ्यांना लाभले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केंद्राच्य सुवर्णा घुले,कल्याणी शिंदे,शोभा बुरसे,संध्या बोनवटे,निलम कानसकर व कोंडीराम जगताप भाऊसाहेब,विद्या शिंदे इत्यादी अनेक सेवेकऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Previous articleऋतिक गोंधळी यांचा संशयास्पद मृत्यू: संशयास्पद मृत्यू झाला असल्याचा युवकाच्या नातेवाईकांचा आरोप
Next articleधामणी,शिरदाळे,पहाडरा परिसरातील शेतकरी करतोय कोरड्यात पेरणी