वेदांत नांगरे याची अनोखी विठ्ठल भक्ती : पेन्सीलने रेखाटले विठ्ठलाचे चित्र

घोडेगाव,मोसीन काठेवाडी

न्यु इंग्लीश मिडियम स्कुल घोडेगाव (ता.आंबेगाव ) येथे इयत्ता ९वीच्या वर्गात शिकत असेलला विद्यार्थी कु.वेदांत धनंजय नांगरे याने आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठलाचे सुंदर असे मनमोहक पेन्सील चित्र रेखाटले आहे.त्याच्या ह्या कलेचे कौतुक होत आहे.शाळेतील विषय शिक्षक समीर मुजावर यांनी त्याला मार्गदर्शन केले.

नेहमीच वेगवेगळ्या संकल्पना वापरून चित्राच्या माध्यमातून सामाजिक संदेश देणाऱ्या युवा चित्रकार वेंदात नांगरे याची आषाढी एकादशीच्या निमित्ताने अनोखी विठ्ठल भक्ती समोर आली आहे.

Previous articleजमीन सुपीकता जागृती दिन उत्साहात साजरा
Next articleश्रीराम मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी “मराठी बाणा”चे आयोजन लाखो रूपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा