जमीन सुपीकता जागृती दिन उत्साहात साजरा

 किरण वाजगे – नारायणगाव

महाराष्ट्र शासन कृषी विभागाअंतर्गत  २५ जून ते १ जुलै २०२३ या कालावधीत कृषी संजीवनी सप्ताहा निमित्त पिंपळवंडी (ता. जुन्नर) येथे जमीन सुपीकता जागृती दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कृषी सहाय्यक पिंपळवंडी डी. ए. ढोले तसेच कृषी विभागातील विविध योजनांबाबत उपस्थित शेतकऱ्यांना माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून साहेबराव मेंगडे सर यांनी शेतकऱ्यांना जमिनीच्या आरोग्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच महाराष्ट्र शासन कृषी विभाग वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त प्रगतिशील शेतकरी बाळासाहेब नाथा काकडे यांनी जैविक पद्धतीने जमिनीची सुपीकता वाढवण्याबाबत उपस्थित शेतकऱ्यांना माहिती दिली .

तसेच सह्यगिरी सोशल फाउंडेशन संस्थापक – श्रध्दा कैलाश लेंडे यांनी पर्यावरण संवर्धन, सेंद्रिय शेती व प्लास्टिक मुक्त भारत अभियान या विषयी माहिती दिली. कार्यक्रमासाठी माजी पंचायत समिती सभापती संगीता वाघ ,तंटामुक्त समिती अध्यक्ष पिराजी दादा टाकळकर, जुन्नर तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संजय भुजबळ, व माजी ग्रामपंचायत सदस्या अनिताताई कोकाटे आदी मान्यवर उपस्थित होते.

Previous articleआषाढी एकादशीच्या दिवशी नारायणगावात कुर्बानी नाही : मुस्लिम बांधवांचा स्वागतार्ह निर्णय
Next articleवेदांत नांगरे याची अनोखी विठ्ठल भक्ती : पेन्सीलने रेखाटले विठ्ठलाचे चित्र