श्रीराम मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी “मराठी बाणा”चे आयोजन लाखो रूपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा

  किरण वाजगे, नारायणगाव

उत्तर पुणे जिल्ह्यातील व ऐतिहासिक जुन्नर तालुक्यातील आध्यात्मिक वारसा असलेल्या पिंपळगाव तर्फे नारायणगाव मध्ये १४० वर्षांपेक्षा जास्त वर्ष जुन्या असलेल्या श्रीराम मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी नवी मुंबई येथे समस्त ग्रामस्थ पिंपळगाव व मुंबईकर मंडळांच्या वतीने कौटुंबिक स्नेहसंमेलन नुकतेच आयोजित करण्यात आले होते. या निमित्ताने जुन्नर तालुक्याचे भूमिपुत्र, शिवनेरी भूषण तसेच ज्येष्ठ कलाकार अशोक हांडे यांचा ‘मराठी बाणा, हा मराठी संस्कृतीची ओळख असलेला सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने जुन्नर तालुक्यातील विशेषतः पिंपळगाव येथील ग्रामस्थ मुंबईकर त्यांचे नातेवाईक, मित्रमंडळी, आप्तेष्ट हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून तिकीट विक्री तसेच आर्थिक देणग्यांमधून लाखो रुपयांचा निधी संकलीत करण्यात आला.

या कार्यक्रमाला नवी मुंबईतील व्यापार, उद्योग, बँकिंग, सहकार क्षेत्रातील दिग्गज मंडळी उपस्थित होती. एपीएमसी मार्केटचे माजी अध्यक्ष व कुलस्वामी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष शंकरशेठ पिंगळे, भाऊसाहेब शिंगाडे, दशरथ शिंगाडे, नितीन बनकर, संतोष चव्हाण, सुनील चव्हाण, विजय वाळुंज, प्रकाश मोरे, अण्णाभाऊ भोर, तुषार पालकर, अनिल जाधव, तुषार माळी, रोहिदास मुंडे, शशिकांत अभंग, कपिल भाई भेदा, सतीश कोकणे, प्रशांत भांगरे तसेच पुरुषोत्तम दळवी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

या मान्यवरांचे स्वागत आणि सन्मान श्रीराम मंदिर संस्थानचे अध्यक्ष सुरेश वऱ्हाडी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अशोक खांडगे वसंत वऱ्हाडी, प्रदीप चव्हाण सत्यवान वाणी, वृंदावन वाणी, चंद्रकांतशेठ वऱ्हाडी, वसंत वऱ्हाडी, प्रदीप चव्हाण, अजित देवकर, बाळासाहेब वऱ्हाडी, सुनील खांडगे, सत्यवान वाणी, दत्ता वऱ्हाडी, संतोष खांडगे, हनुमंत खांडगे, राहुल खांडगे, श्याम वाणी, उमेश वाणी, पद्माकर चव्हाण, अनिकेत वाणी यांनी विशेष परिश्रम घेतले.

पिंपळगाव चे रहिवासी राजेश गावडे, सुरेश वाणी, रमेश खांडगे, निलेश चव्हाण, राकेश चव्हाण, रमेश खांडगे, श्रीराम मंदिर संस्थांनचे अशोक खांडगे, गणेश चव्हाण, अविनाश वऱ्हाडी, मधुसूदन देवकर, शशिकांत बेलेकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Previous articleवेदांत नांगरे याची अनोखी विठ्ठल भक्ती : पेन्सीलने रेखाटले विठ्ठलाचे चित्र
Next articleनारायणगाव येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार : गेल्या तीन वर्षात बारा पेक्षा जास्त वन्यप्राण्यांचा अपघातात मृत्यू