नारायणगाव येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार : गेल्या तीन वर्षात बारा पेक्षा जास्त वन्यप्राण्यांचा अपघातात मृत्यू

नारायणगाव :- किरण वाजगे

पुणे नाशिक महामार्गावरील नारायणगाव व कळंब गावच्या हद्दीवर एस आर पेट्रोल पंपाजवळ पाच ते सहा वर्षाच्या बिबट्याला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्या बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवार दि.२८ रोजी रात्री ११ ते १२ च्या दरम्यान घडली. अशी माहिती वनक्षेत्रपाल स्मिता राजहंस यांनी दिली.

गेल्या तीन वर्षात कळंब ते नारायणगाव दरम्यान पुणे नाशिक महामार्गावर सुमारे १२ पेक्षा जास्त वन्यप्राणी, त्यामध्ये बिबट्या, तरस, कोल्हा, रानमांजर आदी वन्यप्राण्यांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान नारायणगावचे पोलीस पाटील सुशांत भुजबळ, ग्राम सुरक्षा दलाचे जवान यांनी घटनास्थळी जाऊन मृत बिबट्याला पुढील कार्यवाहीसाठी मंचर वनविभागाच्या ताब्यात दिले. येथील ग्रामसुरक्षा दलातील जवान, हर्षवर्धन भास्कर, यश सरोदे, अजय दरंदळे, ऋत्विक डेरे, आदित्य डेरे, पोलीस पाटील सुशांत भुजबळ यांनी मृत बिबट्याला वनपाल नितीन विधाटे, वनपाल मडके, होले, वनरक्षक औटी, वनरक्षक पवार, भुजबळ यांच्या ताब्यात दिले. घटनास्थळी नारायणगावचे पोलीस उपनिरीक्षक सनील धनवे, अवि वैद्य यांनी भेट देऊन घटनेची पाहणी केली.

दरम्यान मृत बिबट्याचे शिवविच्छेदन करून त्याच्यावर अवसरी वन उद्यान परिसरात अंत्यसंस्कार करण्यात आले. अशी माहिती वनक्षेत्रपाल राजहंस यांनी दिली.

Previous articleश्रीराम मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी “मराठी बाणा”चे आयोजन लाखो रूपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा
Next articleचांगला पाऊस पडु दे, शेतकऱ्यांच्या घरी सुख समृद्धी नांदू दे’ श्रीविठ्ठल चरणीआमदार राहुल कुल यांची आषाढी एकादशी निमित्ताने श्रीक्षेत्र विठ्ठल बन डाळिंब याठिकाणी श्री विठ्ठल चरणी    प्रार्थना