चांगला पाऊस पडु दे, शेतकऱ्यांच्या घरी सुख समृद्धी नांदू दे’ श्रीविठ्ठल चरणीआमदार राहुल कुल यांची आषाढी एकादशी निमित्ताने श्रीक्षेत्र विठ्ठल बन डाळिंब याठिकाणी श्री विठ्ठल चरणी    प्रार्थना

उरुळी कांचन

चांगला पाऊस पडु दे, शेतकऱ्यांच्या घरी सुख समृद्धी नांदू दे, अशी प्रार्थना श्रीविठ्ठल चरणी. दौंड तालुका प्रामुख्याने शेतीवर आवलंबून असल्याने दिवसेंदिवस शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभिर होऊ लागला आहे. तरीही काळजीचे कारण नाही, मुळशीचे पाणी मिळवून दौंडच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवणार असा निर्धार भाजप बारामती मतदारसंघ प्रमुख दौंडचे आमदार अँड.राहुल कुल यांनी श्रीक्षेत्र विठ्ठल बन डाळिंब येथे कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला आहे. दौंड हवेली आणि पुरंदर या तीन तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या आणि याभागातील प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र विठ्ठल बन डाळिंब येथील विठ्ठलाची एकादशी निमित्त पूजा आमदार राहुल कुल यांच्या हस्ते करण्यात आली.

श्रीविठ्ठल बन देवस्थान ट्रस्ट डाळिंब आणि ग्रामपंचायत डाळिंब यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
आमदार कुल आपल्या भाषणात पुढे म्हणाले, दौंडच्या जनतेने माझ्यावर व्यक्त केलेला विश्वास सार्थ ठरवेन. दौंड तालुक्याचे अनेक प्रश्न सोडवले आहेत, काही राहिले आहेत. तेही लवकरच सोडवले जातील, रस्ते, वीज, आरोग्य आदी कोणतीही समस्या असू द्या. तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आणि सर्वांना विश्वासात घेऊन प्रश्न सोडवेन, याची ग्वाही देतो.

याप्रसंगी दौंडचे माजी आमदार जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष रमेश थोरात, दौंडचे तहसीलदार अरुण शेलार, मा.सरपंच माऊली कांचन, जिल्हा परिषद सदस्य कीर्ती कांचन, मा.जि.प.सदस्य महादेव कांचन, माजी पंचायत समिती सदस्य किसन म्हस्के, डाळिंबचे सरपंच बजरंग म्हस्के, सरपंच भाऊसाहेब कांचन, पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य संतोष कांचन, महाराष्ट्र प्रदेश सरपंच परिषद अध्यक्ष नवनाथ काकडे, प्रकाश शेलार, तुकाराम ताकवणे, पंचायत समितीचे सदस्य नितीन दोरगे, मा. सभापती महादेव यादव, डॉ मणिभाई देसाई पतसंस्थेचे उपाध्यक्ष रामदास चौधरी, संचालक शरद वनारसे, कांतीलाल चौधरी, माजी सरपंच राजेंद्र तावरे, संदिप ताम्हाणे, सागर म्हस्के, ग्रा.प.सदस्य अमित कांचन, नंदकुमार म्हस्के, सरपंच सागर शेलार, ह.भ.प. डॉ. रवींद्र भोळे, योगेश मदने, अभिजित ताम्हाणे, सर्जेराव म्हस्के, ग्रामविकास अधिकारी संतोष नेवसे, देवस्थानचे सर्व विश्वस्त, डाळिंब ग्रामपंचायतचे सदस्य, ग्रामस्थ, महिला, तरुण वर्ग, पत्रकार बांधव, आदी पदाधिकारी, हजारो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्तविक देवस्थानचे अध्यक्ष डॉ. मणिभाई पतसंस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कांचन यांनी केले. सूत्रसंचालन एल.बी. म्हस्के यांनी तर आभार तानाजी म्हस्के यांनी मानले.
यापरिसरातील ही मोठी यात्रा असुन येथे विविध खेळणी दुकाने, पाळणे, मोठ्या प्रमाणात आले होते. दिवसभर भजनी मंडळ, गावोगावचे ढोललेझीम खेळ आलेले होते. खेळ पाहून इनाम देण्यात आले. यावर्षी अंदाजे दीड लाख भाविक अगदी पहाटे पासून आले होते.

Previous articleनारायणगाव येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार : गेल्या तीन वर्षात बारा पेक्षा जास्त वन्यप्राण्यांचा अपघातात मृत्यू
Next articleउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महिला व बाल कल्याण मंत्री लोढा यांचा अंगणवाडी सेविकांकडून सत्कार तसेच महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांच्या वतीने ऊर्जा मंत्री यांना दिले निवेदन