कुरकुंभ ब्रिज खाली ५५वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला

कुरकुंभ : सुरेश बागल

ग्रामपंचायत कुरकुंभ हद्दीमध्ये ब्रिजच्या खाली दि २३ जून २०२३ रोजी दुपारी दोनच्या सुमारास कुरकुंभ गावच्या पोलीस पाटील रेश्मा विनोद शितोळे यांना फोनद्वारे माहिती मिळाली की, या ठिकाणी अंदाजे वय ५०ते ५५वर्ष पुरुष जातीचा मृतदेह आढळला आहे, अंगात पिवळसर चौकडा शर्ट व लुंगी गुंडाळलेला तसेच केस वाढलेले सदर व्यक्ती हा कुरकुंभ परिसरात भिक मागून जगत असल्याची माहिती पुढे आली आहे, अशा प्रकारची माहिती पोलीस पाटील शितोळे यांनी दौंड पोलीस स्टेशनला दिली आहे,

या व्यक्ती बाबत कोणाला काही माहिती असल्यास दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार श्रीरंग शिंदे मो.९८९०१३३७४४ यांच्याशी संपर्क साधावा.

Previous articleजातिवाचक शिवीगाळ प्रकरणी नारायणगाव येथे खैरे दाम्पत्यावर गुन्हा दाखल
Next articleभटकळवाडी लेंडेमळा येथे शेताच्या बांधावर बिबट्याचा ठिय्या