साक्षी कोल्हेचे नीट परीक्षेत घवघवीत यश

दिनेश पवार:दौंड

देऊळगाव राजे येथील साक्षी संतोष कोल्हे ने नीट परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्यामुळे परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे, साक्षीला नीट परीक्षेत ७२० पैकी ६०८ गुण मिळाले आहेत,साक्षीचे इयत्ता दहावी पर्यंतचे शिक्षण सेंट सेंबेस्टीयन हायस्कूल दौंड येथे झाले असून तिला दहावीत ९३ टक्के गुण असून,बारावी पर्यंतचे शिक्षण भिगवण येथील के.एस.के.विद्यालय येथे झाले आहे,

ग्रामीण भागातील शेतकऱ्याच्या मुलीने घवघवीत यश मिळवल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे,जिद्द,चिकाटीच्या जोरावर ग्रामीण भागात शिक्षण घेऊन देखील साक्षीने उत्कृष्ट यश मिळवले आहे,पुढे एम.बी.बी
एस.शिक्षण घेऊन वैद्यकीय क्षेत्रात करिअर करणार असल्याचे साक्षीने सांगितले

Previous articleभक्तिमय वातावरणात सिद्धेश्वर दिंडीचे प्रस्थान
Next articleभोसे येथील मॉडर्न शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांची G 20 शिखर संमेलन प्रदर्शनास भेट