भोसे येथील मॉडर्न शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांची G 20 शिखर संमेलन प्रदर्शनास भेट

चाकण-  भोसे (ता.खेड)येथील मॉडर्न हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथील G20 शिखर संमेलनानिमित्त राष्ट्रीय स्तरावरील पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान या विषयावर मांडण्यात आलेल्या प्रदर्शनास भेट दिली.अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतिश गवळी यांनी दिली .

देशभरातील अध्ययन आणि अध्यापनात चालू असलेले भविष्यकालीन प्रयोग , भेटायला येणारा रोबो , पारंपारिक जादुई पिटाऱ्यापासून आभासी त्रिमितीय जगापर्यंतचे अभिनव प्रयोग , पुणेरी वाहन उद्योगांची डिजिटल भिंत,केरळच्या प्राथमिक शिक्षणापासून ते मेघालयातील पहाडी शिक्षणापर्यंत सर्वच राज्यांतील शैक्षणिक प्रयोगांचा महाकुंभ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ भरला आहे .त्याची झलकएकाच ठिकाणी पाहण्याची विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी लाभल्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रदर्शन पाहिल्यानंतर आनंद व्यक्त केला .

Previous articleसाक्षी कोल्हेचे नीट परीक्षेत घवघवीत यश
Next articleजगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीने भक्तिमय वातावरणात पार केला रोटी घाट