भक्तिमय वातावरणात सिद्धेश्वर दिंडीचे प्रस्थान

दिनेश पवार: दौंड

सिद्धेश्वर वारकरी संस्था देऊळगाव राजे च्या वतीने आषाढी पायी वारी सोहळा देऊळगाव राजे ते श्री क्षेत्र पंढरपूर दिंडीचे भक्तिमय वातावरणात सोमवार दि.१९ जून रोजी प्रस्थान झाले, यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी संत तुकाराम,विठुराय,रुक्मिणी आशा विविध संतांची वेशभूषा साकारली होती,

यावेळी सिद्धेश्वर दिंडीने वारी दरम्यान पर्यावरण संवर्धनासाठी प्लॅस्टिक मुक्त वारी,स्वच्छतेचा संदेश देण्याचा निर्णय घेतल्याचे शांतीलाल गिरमकर यांनी सांगितले, वारी दरम्यान भजन,कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे, सिद्धेश्वर दिंडीचे हे सोळावे वर्ष आहे,गावातील सिद्धेश्वर मंदिरात महाप्रसाद झाल्यानंतर संपूर्ण गावात प्रदक्षिणा घेऊन दिंडी पंढरपूर कडे मार्गस्थ झाली,यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते

Previous articleमहाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त मुख्याध्यापक संघाची कार्यकारणी जाहीर
Next articleसाक्षी कोल्हेचे नीट परीक्षेत घवघवीत यश