शेतकरी बांधवांना आर्थिक दुष्टया कणखरपणे उभे करण्यासाठी माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील आहे-देविदास दरेकर

घोडेगाव – मोसीन काठेवाडी

आपण आपल्या कार्यातून समाजातील दिनदुबळयाची जनतेची सेवा करून त्यांच्या मनात आपले स्थान निर्माण करावे असे प्रतिपादन लोकनते व लोकप्रिय माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले ते घोडेगाव ता.आंबेगाव येथे व्यवसाय मार्गदर्शन शिबीरात मोठ्या संख्येने उपस्थितीत महिला बचत गटांतील महिला,युवक व शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करताना बोलत होते.पुढे बोलताना ते म्हणाले युवक व महिलांनी नोकरीच्या मागे न धावता स्वयंरोजगाकडे.वळावे यातूनच उद्या येथे भावी उद्योजक उदयास येतील व गावपातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण होतील त्यासाठी मी माझ्या परिने जितके शक्य होईल तितके राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून विविध कल्याणकारी योजना राबवत ग्रामीण भागात स्थानिक पातळीवर प्रशिक्षणाच्या माध्यमातून संधी उपलब्ध करून देऊन उद्योग व्यवसायांना चालना देण्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्यातून सतत कार्यशील असेल .

आपले मनोगत व प्रस्ताविक माडतांना घोडेगाव पेठ जिल्हा परिषद सदस्य व गटनेते देविदास दरेकर आपल्या भावनांना वाटमोकळी करून देताना म्हणाले केवळ कुठला पक्ष म्हणून नव्हे तर समाजातील प्रत्येक घटकांला आधार देणेसाठी व विकासाच्या नव्यादिशेकडे घेऊन जाणेसाठी माझी तळमळ आहे.मी देखील तुमच्यासारख्या गरीब शेतकरी कुटुंबातील आहे.केवळ शेतीवर अवलंबून न राहता घोडेगाव येथे उद्योग व्यवसाय करत,समाजसेवेचे व्रत जोपासत,ज्या समाजाने मोठ्या विश्वासाने समाज्याची सेवा करण्याची संधी उपलब्ध करुन दिली.केवळ माझा घोडेगाव पेठ नव्हे तर सातगावपठार लांडेवाडी घोडेगावसह आदिवासी पश्चिम पट्टा व पूर्वपट्टा स्थानिक उपलब्ध शेती,उत्पादन बटाटा, कांदे टाँमेटो व हिरडा उत्पादक शेतकऱ्यांना शेती पूरक व्यवसायाना चालना देणेसाठी विविध प्रकल्प सुरु करण्याच्या प्रयत्नांना गती देऊन शेतकरी बांधवांना आर्थिक दुष्टया खणकरपणे उभे करण्यासाठी येथे लोकनेते व लोकप्रिय माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्नांची परिकाष्टा करणार असल्याचे सांगितले या वेळी ते म्हणाले जिल्हापरिषद मतदार संघातील गोरगरीब जनतेची सेवा करुन या मायभूमीचे मी फेडीन ऋण सारे अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

यावेळी सर्वसामान्य नागरिकांना स्वताच्या पायावर उभे राहता यावे यासाठी शिवसेना गटनेते देविदास दरेकर तसेच त्यांच्या सौभाग्यवती सुवर्णवेध फाऊंडेशनचे अध्यक्ष सुर्वणा दरेकर यांनी व्यवसाय मार्गशन शिबीराचे आयोजन केले.गोर-गरिब नागरिक,बेरोजगार युवक,महिला यांसाठी असलेल्या या शिबीरासाठी नागरीकांचा प्रचंड प्रतिसाद बघून या शिबीराने संपुर्ण पुणे जिल्ह्यात एक आदर्श निर्माण केल्याचे चित्र बघावयास मिळाले.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना घडविणाऱ्या राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने सी.बी कोरा ग्रामोद्योग संस्थान खादी व ग्रामोद्योग सूक्ष्म लघू उद्यम एवं उद्योग मंत्रालय भारत सरकार व सुवर्णवेध फाऊंडेशन यांच्या संयुक्त विदयमाने घोडेगाव येथील पुजा गार्डन मंगल कार्यालय येथे व्यवसाय मार्गदर्शन कार्यशाळा मेळावा शिवसेनेचे उपनेते,शिरूर लोकसभेचे माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात कार्यक्रम संपन्न झाला.
केंद्र शासनाच्या उदयोग विभागा मार्फत ही सुविद्या देविदास दरेकर यांनी घोडेगाव-पेठ जिल्हा परिषद गटात आणली,आणी खरच गोर-गरिबांसाठी प्रमाणिकपणे कर्ज मिळून व्यवसाय उभारणीसाठी देविदास दरेकर हे प्रयत्न करत असल्याचे शिवाजी दादा आढळराव पाटील यांनी देविदास दरेकर व त्यांच्या सहकार्याचे कौतुक करताना सांगितले.

या प्रसंगी जुन्नरचे माजी आमदार शरद सोनावणे, शिवसेना गटनेते देविदास दरेकर,अतिरिक्त निजी सचिव संदीप पोखरकर,सुवर्णवेध फाऊंडेशनचे अध्यक्ष सुर्वणा देविदास दरेकर,प्राचार्य एस एस तांबे,शिवसेना आंबेगाव तालुका प्रमुख अरुण गिरे,युवासेना जिल्हा प्रमुख प्रविण थोरात,युवासेना राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य सचिन बांगर,पंचायत समिती सदस्य रविंद्र करंजखिले,शिवसेना घोडेगाव शहर प्रमुख तुकाराम काळे,उपतालुका प्रमुख मिलिंद काळे,इग्लिंश मेडियमचे चेअरमन बाळासाहेब काळे,अलका घोडेकर,शिवाजी राजगुरु,उद्योजक महेश ढमढेरे,सुनील बाणखिले, नितीन सोनवणे,प्रकल्प अधिकारी बळवंत गायकवाड, तहसिलदार संजय नागटिळक,प्राचार्य आय बी जाधव, घोडेगावचे साहायक पोलिस निरीक्षक जीवन माने,लक्ष्मण काचोळे,विश्वास लोहोट,कांचन काळोखे,मनोज काळे,ज्योती गाडे,मनीश काळे,खंडुशेठ खंडागळे,आदि मान्यवर सह आंबेगाव तालुका,घोडेगाव तसेच पंचक्रोशितील महिला व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी माजी आमदार शरद सोनावणे म्हणाले जिल्हा परिषदचा कार्यक्षम सदस्य कसा असतो याची मूर्तीमंत उदाहरण देविदास दरेकर आहेत. यावेळी ज्येष्ठ महिला पार्वताबाई दत्तात्रय दरेकर,प्रियांका गणेश मानकर,दिपाली सावंत,यांचा विशेष कार्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सुंदर असे सुत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक अमित कातोळे यांनी पाहिले.प्रस्ताविक देविदास दरेकर यांनी केले तर शेवटी आभार अशोकशेठ बाजारे यांनी मानले.

Previous articleस्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी प्रभाकर बांगर यांची नियुक्ती
Next articleनायगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संगीता शेलार यांची बिनविरोध निवड