नायगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संगीता शेलार यांची बिनविरोध निवड

उरुळी कांचन

पूर्व हवेली तालुक्यातील नायगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदाचा उत्तम नाना शेलार यांनी राजीनामा दिल्याने या पदासाठी निवडणूक घेण्यात आली. संगीता रघुनंदन शेलार यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. सदरची निवडणूक सरपंच जितेंद्र पांडुरंग चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. तर निवडणूक कामकाज ग्रामसेवक विजय भगत यांनी पार पाडले.

नायगाव ग्रामपंचायतच्या स्थापनेपासून प्रथमच सलग दोन वेळा भीम नगर येथील प्रतिनिधीला उपसरपंच मिळाले असल्याचे उत्तम शेलार यांनी सांगितले. श्री काळभैरवनाथ परिवर्तन पॅनलच्या धोरणाप्रमाणे संपूर्ण गावचे विकासासाठी सर्वांना बरोबर घेऊन काम करणार असल्याचे नवनिर्वाचित उपसरपंच शेलार यांनी सांगितले.

याप्रसंगी पॅनल प्रमुख राजेंद्र चौधरी, विद्यमान सदस्य गणेश चौधरी, कल्याणी हगवणे, दत्तात्रय बारवकर, अश्विनी चौधरी, पल्लवी गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, प्रियंका गायकवाड, रामचंद्र पवार, भाऊसाहेब चौधरी, पोपट चौधरी, उत्तम घुले, नितीन हगवणे, नवनाथ गायकवाड, विजय चौधरी, योगेश चौधरी, राजेंद्र शेलार, गुलाब चौधरी, संजय चौधरी, किरण चौधरी इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous articleशेतकरी बांधवांना आर्थिक दुष्टया कणखरपणे उभे करण्यासाठी माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील आहे-देविदास दरेकर
Next articleमहाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त मुख्याध्यापक संघाची कार्यकारणी जाहीर