स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी प्रभाकर बांगर यांची नियुक्ती

आंबेगाव -मोसीन काठेवाडी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी प्रभाकर बांगर यांची नियुक्ती करण्यात आली आहे नुकतेच पुणे येथील शासकीय विश्रामगार्‍यावरती बांगर यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र देण्यात आले प्रभाकर बांगर यांनी मागील दहा-बारा वर्षांपासून शेतकरी कष्टकरी गोरगरीब जनतेसाठी सातत्याने आवाज उठवला आहे अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांनी मार्गी लावण्याचे काम केले आहे त्यामध्ये विजेच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये बियाणे फसवणुकीचा विषय असो किंवा शेतीमालाला बाजार भाव मिळावा म्हणून तसेच दुधाचे आंदोलन असेल अशा अनेक आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम केले आहे.

त्यांनी केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे त्यांना आंबेगाव तालुका अध्यक्ष पदावरून पुणे जिल्हा अध्यक्ष पदावर नियुक्त करण्यात आले आहे यावेळी बोलताना प्रभाकर बांगर म्हणाले यापुढे देखील संपूर्ण आयुष्य शेतकरी व कष्टकरी गोरगरीब जनतेसाठी समर्पित करणार आहे त्यांच्या प्रश्नासाठी व त्यांच्या न्याय हक्कासाठी सातत्याने लढत राहणार आहे पुणे जिल्ह्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ताकद वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणारा असून शेतकरी व शेतकऱ्यांच्या तरुण मुलांना संघटित करून स्वाभिमानी शेतकरी संघटना मजबूत करण्याचे काम पुणे जिल्ह्यामध्ये केले जाईल असे बांगर यावेळी म्हणाले.

Previous articleवीज कंत्राटी कामगारांना न्याय देणार : आभा शुक्ला प्रधान सचिव ऊर्जा यांची घोषणा
Next articleशेतकरी बांधवांना आर्थिक दुष्टया कणखरपणे उभे करण्यासाठी माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील आहे-देविदास दरेकर