नव्या शैक्षणिक वर्षात जि.प.शाळा वडजाई येथे विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

गणेश सातव , वाघोली

१५ जुन अर्थात जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस.या दिवशी सर्वंच शाळांमध्ये इयत्ता पहिली सह नवीन ही विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात येते.

पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या आखत्यारित, वाघोली केंद्र शाळे अंतर्गत असणाऱ्या जिल्हा परिषद शाळा,वडजाई (आव्हाळवाडी-ता-हवेली)येथे इयत्ता पहिलीसह इतरही इयत्तेतील नवीन विद्यार्थ्यांचे शाळेचे सर्व शिक्षक,स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या वतीने रांगोळीच्या पायघड्या घालून,औक्षण करुन, गुलाबपुष्प, चॉकलेट्स,नवीन गणवेश व शैक्षणिक पुस्तके देऊन संगीताच्या मधुर तालावर मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.या स्वागत कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांच्या स्वागत छायाचित्रणासाठी खास ‘सेल्फी पॉईंट’ हि तयार करण्यात आला होता.

यावेळी आव्हाळवाडी गावचे विद्यमान सरपंच नितीन घोलप,उपसरपंच प्रशांत सातव,शाळेचे मुख्याध्यापक शंकर बडे सर,उपशिक्षक गणेशानंद दराडे सर,सुरेखा खोसे मँडम,वैष्णवी सातव मँडम यांच्यासह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

शाळेच्यावतीने मुख्याध्यापक शंकर बडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.स्वागत समारंभ कार्यक्रमाचे प्रास्ताविक शंकर बडे सर यांनी केले. विद्यार्थी,प्रमुख मान्यवर पाहुणे व पालकांचे स्वागत सुरेखा खोसे व वैष्णवी सातव यांनी केले,तर आभार प्रदर्शन गणेशानंद दराडे सर यांनी केले.

Previous articleजुन्नरच्या विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी मिळणार पाठ्यपुस्तके
Next articleपुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाटस जवळ भीषण अपघात: चुलता पुतण्याच्या जागीच मृत्यु