गगनझेप प्रतिष्ठान सामाजिक संस्थे मार्फत प्रमाणपत्र वाटप

योगेश राऊत ,पाटस

गगनझेप प्रतिष्ठान व दौंड पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या फॅशन डिझाईनिंगच्या प्रशिक्षण शिबिरामध्ये सहभागी झालेल्या महिलांना गुरुवार (ता.०८) रोजी हातवळण ग्रामपंचायतमध्ये गट विकास अधिकारी अजिंक्य येळे यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष आप्पासाहेब पवार, सरपंच योगेश फडके, उपसरपंच सखाराम शिंदे, ग्रामसेवक प्रज्ञा चव्हाण, गगनझेप प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल चव्हाण, पोलीस पाटील संजय म्हेत्रे, बाजार समितीचे माजी सभापती सागर फडके, प्रहार क्रांती आंदोलनाचे जालिंदर दिवेकर, शरद दिवेकर, सुभाष दिवेकर, शहाजी बदरगे, सोमनाथ लवांड, प्रशिक्षणार्थी महिला व आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

दौंड तालुक्यातील ग्रामीण भागातील महिलांना घरकामासोबत जोडव्यवसाय करून कुटुंबाला आर्थिक मदत होण्यासाठी गगनझेप प्रतिष्ठानच्या वतीने मोफत शिलाई मशीन प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी पाटस येथे पंधरा दिवसांचा शिलाई मशीन प्रशिक्षण शिबीरात तालुक्यातील ग्रामीण भागातील एकूण 85 महिलांनी सहभाग घेतला होता. अनेक महिलांनी पंधरा दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण केले असल्याने संबंधित महिलांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले आहे.

तसेच हातवळण येथील ग्रामपंचायतच्या वतीने ग्रामस्थांना यशवंत घरकुल योजना वास्तू वाटप, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सन्मान पुरस्कार, दौंड पंचायत समिती मार्फत शिलाई मशीन व पिठ गिरणी वाटप करणे अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन तंटामुक्तीचे अध्यक्ष मंगेश फडके यांनी केले होते.

Previous articleसंतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी मार्गावरील साफसफाई दोन दिवसात न केल्यास उपोषण करणार : सामाजिक कार्यकर्ते उमेश म्हेञे
Next articleजुन्नरच्या विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी मिळणार पाठ्यपुस्तके