संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी मार्गावरील साफसफाई दोन दिवसात न केल्यास उपोषण करणार : सामाजिक कार्यकर्ते उमेश म्हेञे

कुरकुंभ :  सुरेश बागल

संतश्रेष्ठ तुकाराम महाराजाच्या पालखीचे प्रस्थान उद्या होणार असून हडपसर पासून ते कासुडीॅ आणि पाटस पर्यंतच्या हायवेवरील कचरा,अत्यवस्थ पडलेल्या लोखंडी. जाळया, सिग्नलची दुरावस्था,झाडेझुडपे ,हायवेवरील खड्डे तसेच इतर ञुटी संदर्भात मांजरी मार्केट यार्ड ते कासुडीॅ टोलनाका आणि पाटस टोलनाक्या पर्यंतच्या हायवेवरील रस्त्यांच्या कडेला भरपूर प्रमाणात पुण्यात-मुंबईत माल घेऊन जाणाऱ्या गाड्या शिल्लक राहिलेला कचरा पुण्यातून बाहेर निघाल्यावर रस्त्यांच्या कडेला फेकतात त्यामुळे आजूबाजूच्या लोकांना दुर्गंधीचा ञास होतो आहे .

त्यामुळे लोक आजारी पडत आहेत तसेच ४- ५ दिवसात या रस्त्यावरून संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात ५ ते ६ लाख लोक प्रवास करणार आहेत. तरीही ८ दिवसापासून प्रशासनाला व ठेकेदाराला याबाबत मी दुरूस्ती व साफसफाई करण्यासाठी वारंवार सुचना करीत आहे. तरीही प्रशासन डोळेझाक पणा करीत आहे तरीही २ ते ३ दिवसात हायवेरस्त्यावरील साफसफाई न केल्यास मी सामाजिक कार्यकर्ता उमेश म्हेञे आमरण उपोषण सुरू करणार आहे.

Previous articleकामगार कायद्यातील तरतूदीचा भंग करणाऱ्या महावितरण कंपनी प्रशासनासह कंत्राटदारवर कारवाईचे आदेश
Next articleगगनझेप प्रतिष्ठान सामाजिक संस्थे मार्फत प्रमाणपत्र वाटप