नागेश्वर विद्यालयात एकविस वर्षानंतर मैत्रीला आले उधान … !

योगेश राऊत, पाटस

पाटस : शैक्षणिक वर्ष २००१- ०२ इयत्ता १० वी चा माजी विद्यार्थी – शिक्षक स्नेहसंमेलन व सन्मान सोहळा सर्वांच्या सहकार्याने अतिशय उत्साहाच्या आणि आनंदाच्या वातावरणामध्ये संपन्न झाला. गत काळातील अनेक स्मृतींना सदर मेळाव्यानिमित्त उजाळा मिळाला आहे.

या माजी विद्यार्थी स्नेहसंमेलनासाठी इयत्ता दहावी अ ब क २००२ च्या बॅचचे विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते सकाळी आठ वाजल्यापासून शाळेच्या प्रांगणात विद्यार्थी शाळेच्या गणवेशात त प्रवेश केला बेल वाजली आणि पुन्हा एकदा 21 वर्ष स्मृतीत गेलेली दहावीचा वर्ग पुन्हा भरला यावेळी विद्यार्थ्यांनी प्रार्थना, राष्ट्रगीतने शाळेची सुरवात केली, तसेच वर्गामध्ये शिक्षकांनी दिलेली शिक्षा, पेपर लिहिताना पकडलेली कॉफी किंवा उशिरा आला आल्यामुळे अंगठे धरण्याची केलेली शिक्षा, उठा बश्या या सगळ्या शालेय जीवनातल्या आठवणी प्रत्यक्षात अनुभवल्या.
यापध्तीने तत्कालीन शालेय कालखंडामध्ये विद्यार्थी म्हणून असणाऱ्या विविध आठवणींना यावेळी उजाळा देण्यात आला. अतिशय उत्साहाच्या आणि आनंदमय वातावरणामध्ये या कार्यक्रम संपन्न झाला. वायफळ खर्चाचे सत्कार घेण्याऐवजी सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुप्रती कृतज्ञता अधोरेखित करण्यासाठी परमात्मा श्री विठ्ठलाच्या मूर्ती भेट देऊन गुरु साधनेचा आनंद आणखी द्विगुणित केला होता. आपले विद्यार्थी कर्तृत्वाने मोठ्या ध्येय प्राप्तीला गवसणी घालत असल्याचा अभिमानी भाव शिक्षकांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. या कार्यक्रमात सर्व शिक्षकांना फेटे बांधून बैलगाडीतून गेटवरून आणण्यात आले गुरुंचे पाय चंदन लावून धूवून गुरुपूजन केले गेले आणि शिक्षकांप्रती आदर व्यक्त करण्यात आला. त्या कार्यक्रमाचे सुंदर मनोगत हे राजश्री मोटे गाडगे यांनी केले.

तसेच शाळेसाठी भिंतीवरील थ्रीडी पेंटिंग करून दिले याकामी महेश पवार यांनी सहकार्य केले नंतर महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठलाची मूर्ती भेट म्हणून दिली तसेच जून मध्ये असणाऱ्या सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांचा वाढदिवस केक कापूस साजरा करण्यात आला. श्री निलेश नलावडे याविद्यार्थ्याने सर्व विद्यार्थ्यांना रिटर्न गिफ्ट म्हणून गोष्ट पैशापाण्याची हे पुस्तक गिफ्ट म्हणून दिले त्याचप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती भेट देण्यात आली या कार्यक्रमात माजी विद्यार्थी नी आणि शिक्षकांनी आपली मनोगते व्यक्त केली कार्यक्रमाच्या सर्व गोष्टींचे छायाचित्रण सुद्धा करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अजय आदाटे व सीमा म्हस्के यांनी केले

या कार्यक्रमाचे आयोजन संयोजन सर्व दहावी २००२ च्या प्रतिनिधींनी केले, संदीप कांबळे, राहुल कुंजीर, जावेद बागवान, राहुल शिंदे, विकास निंबाळकर, संदीप भागवत, अभिजीत ढमाले, विक्रांत शितोळे, मिलिंद काळे, विद्या मस्के, रेश्मा देशमुख, सविता बिनवडे, सोनल धोत्रे, छाया मस्के, नलिनी मस्के व सपना सरोदे आणि सर्वांनी पुन्हा एकदा वटपौर्णिमा च्या दिवशी जी झाडे लावली आहेत त्यांचा जन्मदिवस साजरा करण्यासाठी पुढील ४ जून २०२४ ला पुन्हा भेटण्याचे नियोजन केलेआणि सरतेशेवटी आनंदाश्रु डोळ्यात साठवून एकमेकांचा निरोप घेण्यात. शेवटी विद्यार्थ्यांच्या विनंतीला मान देऊन शिक्षक या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा समृद्ध केली त्याबद्दल शतशः ऋण व आभार. आपल्या भाषांतून आपली प्रेमाची आणि मार्गदर्शनाची वीण नेहमीच आमच्या पाठीशी असावी ही अपेक्षा व्यक्त करत सर्वजण विद्यार्थी सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल सन्मानपत्र देवून आभार मानन्यात आले.

Previous articleमहाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने आणली अनोखी टुर पॅकेजीस (प्रवास सहली) पर्यटकांच्या सेवेत
Next articleआडनावाप्रमाणे “घोटाळे’ करून दोन दोन नवऱ्यांची फसवणूक : “घोटाळे”बाज नवरीसह सहा जणांच्या टोळक्याला अटक