दौंड शहरात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध उपक्रमांनी संपन्न

कुरकुंभ:  सुरेश बागल

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते उस्मान अली शाब्दि उर्दू हायस्कूल येथे शंभर देशी झाड रोप लावण्यात आली. वड, पिंपळ, कारंज, जांभूळ, सिताफळ ,आंबा ,चिंच इत्यादी वृक्षांची रोपे लावण्यात आली. सदर कार्यक्रमास पुणे जिल्हा अध्यक्ष पर्यावरण विभाग तन्मय पवार, दौंड शहराध्यक्ष हरेश ओझा , शाळेचे मुख्याध्यापक झरीना काजी, रेहाना मुंनशी व शाळेचे माजी विद्यार्थी अक्रम कुरेशी व आझर कुरेशी ,प्रकाश सोनवणे , निलेश बगाडे ,अतुल जगदाळे , विठ्ठल शिपलकर , रजाक भाई , क्षीरसागर व कार्यकर्ते सर्व शाळेचा स्टाफ उपस्थित होता त्यानंतर तुकाई नगर मंदिराजवळ रोपे देण्यात आली. दौंड मधील वाल्मीक छात्रालय येथे ३५ झाडांच्या बुंध्याना व पानांना कीड लागू नये म्हणून कीटकनाशक औषधाची फवारणी करण्यात आली.

५ जून रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रदेशाध्यक्ष मा. नानाभाऊ पटोले यांच्या वाढदिवसाचे अवचित्य साधून वर्तमानपत्रापासून हाताने तयार केलेल्या कागदी पिशव्या दौंड नगरपालिका , पंचायत समिती , आरोग्य अधिकारी वन विभाग दौंड, पोलीस स्टेशन तसेच शहरांमधील व्यापारी , भाजी विक्रीते यांना पर्यावरणाविषयी जनजागृती करण्यासाठी सदर कागदी पिशव्या सप्रेम भेट देण्यात आल्या आहेत . या उपक्रमाचे व्यापारी बांधवांनी स्वागत केले आहे सर्व कार्यक्रमाचे आयोजन पुणे जिल्हा पर्यावरण विभागाचे आय काँग्रेस यांच्या वतीने करण्यात आले होते.

Previous articleहिवरे तर्फे नारायणगाव येथे कोयत्याने वार करून एक जण जखमी
Next articleमहाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने आणली अनोखी टुर पॅकेजीस (प्रवास सहली) पर्यटकांच्या सेवेत