हिवरे तर्फे नारायणगाव येथे कोयत्याने वार करून एक जण जखमी

नारायणगाव (किरण वाजगे)

आपल्या शेतजमिनीच्या कंपाउंडच्या तारा का काढता असे विचारले असता एकावर कोयत्याने वार करणाऱ्या दोन जणांना नारायणगाव पोलिसांनी अटक केली आहे. अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली. या घटनेची फिर्याद परेश शांतीलाल गुंदेचा (वय ३३, राहणार दरंदळे मळा, नारायणगाव) यांनी दिली.

याबाबत गुंदेच्या यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक ५ जून रोजी सायंकाळी सहा च्या सुमारास त्यांनी खरेदी केलेल्या जमिनीची पाहणी करण्यासाठी गेले असता त्यांना महेंद्र मच्छिंद्र कोकाटे (रा. हिवरे तर्फे नारायणगाव) व त्याचा कामगार सचिन मढेकर (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) हे दोघेजण खरेदी केलेल्या जमिनीचे तारेचे कंपाउंड काढत होते. गुंदेच्या यांनी त्यांना माझ्या शेतजमीचे कंपाउंड का काढत आहात असे विचारले असता महेंद्र कोकाटे याने हे माझे क्षेत्र आहे. तू लोकांना पैसे देऊन आमची जमीन नावावर करून घेतली. तुझी कागदपत्रे खोटी आहे तू या ठिकाणी यायचे नाही. तेव्हा गुंदेच्या यांनी मी रितसर जमिनीची खरेदी केली असून पैसे दिले आहे. तू मला त्रास देऊ नको असे सांगितले. हे ऐकून आरोपी सचिन मढीकर यांनी गुंदेच्या यांचे हात पकडले व महेंद्र कोकाटे याने त्यांच्या डोक्यात कोयत्याने डाव्या बाजूला वार केला यावेळी गुंदेच्या यांच्या डाव्या हाताच्या तीन बोटांना देखील दुखापत झाली आहे. या घटनेतील आरोपींवर नारायणगाव पोलीस स्थानकात भा.द.वि. कलम ३०७, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ताटे करीत आहेत.

Previous articleसरपंच परिषदेचे उपाध्यक्ष शशिकांत मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त संपर्क बालग्राम अनाथ आश्रमात मुलांना फळ व खाऊ वाटप
Next articleदौंड शहरात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध उपक्रमांनी संपन्न