सरपंच परिषदेचे उपाध्यक्ष शशिकांत मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त संपर्क बालग्राम अनाथ आश्रमात मुलांना फळ व खाऊ वाटप

चाकण- महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचे उपाध्यक्ष शशिकांत मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त संपर्क बालग्राम मधील मुलांसमवेत वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी केक कापून व अनाथ मुलांना फळ वाटप व खाऊ वाटप करण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रमांना फाटा देत सामाजिक उपक्रम राबविला. उपस्थित सरपंचांच्या वतीने सरपंच परिषदेचे उपाध्यक्ष शशिकांत मोरे यांचा ज्ञानेश्वरी देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचे उपाध्यक्ष शशिकांत मोरे, खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सयाजी राजे मोहिते, शेलपिंपळगावच्या सरपंच विद्याताई मोहिते, सिद्धेगव्हाणचे सरपंच दौलतराव मोरे, चिंचोशीच्या सरपंच उज्वलाताई गोकुळे, दौंडकरवाडीचे सरपंच सितारामशेठ गुजर, चेअरमन बापू मोहिते, माहिती सेवा समिती उपाध्यक्ष संतोष साबळे, ग्रामपंचायत सदस्य सौ. स्वाती मोरे, ग्रामपंचायत सदस्य मनोज मोरे, सौ. मंदाकिनी चव्हाण, प्रा. मनीषा मोरे, सुरेश गोकुळे, राहुल मोहिते, मारुती काका मोहिते, माजी सैनिक धनंजय धाऊत्रे, पर्यावरण समितीचे अध्यक्ष जयसिंग धाऊत्रे, आत्माराम गाडे, अक्षय वाडेकर, अमोल धाऊत्रे, धीरज मोरे प्रणव शेळके, सौरभ मोरे, इत्यादी उपस्थित होते.

Previous articleपुणे अप्पर कामगार आयुक्त यांच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता : लेबर आॕफीस पुणे येथे होणार उपोषण
Next articleहिवरे तर्फे नारायणगाव येथे कोयत्याने वार करून एक जण जखमी