पुणे अप्पर कामगार आयुक्त यांच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता : लेबर आॕफीस पुणे येथे होणार उपोषण

कुरकुंभ ,सुरेश बागल

वीज मंडळ शिकाऊ उमेदवार संस्था सातारा या कंत्राटदाराला महावितरणच्या ६ वीज कंत्राटी कामगारांना तातडीने कामावर घेण्याचे आदेश पुणे अप्पर कामगार आयुक्त मा.शैलेंद्र पोळ यांनी १७ मे २०२३ रोजी झालेल्या बैठकीत दिले होते मात्र पुणे अप्पर कामगार आयुक्तां च्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावण्याचे काम कंत्राटदार व वीज कंपनी प्रशासनाकडून झाल्याचे आढळून आले.

महावितरण सातारा व्यवस्थापणाच्या सुचना नसतांना बेकायदेशीर पणे ६ कामगारांना केवळ कंत्राटदारा विरोधात आर्थिक अफरा तफरीची तक्रार पोलिसात केल्याच्या आकस व सूड भावनेने पोटी कंत्राटदाराने 1 जानेवारी पासून कामावर घेतले नव्हते. संघटनेने पत्र व्यवहार व २ वेळा आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला असता चर्चे अखेर हा आदेश देण्यात आला होता मात्र तरी ही कामगारांना न्याय न मिळाल्याने पुन्हा मंगळवार दिनांक ६ जून २०२३ पासून पुणे अप्पर कामगार आयुक्त कार्यालया समोर बेमुदत आमरण उपोषण करणार असल्याचे महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांचे उप सरचिटणीस राहुल बोडके यांनी कळवले आहे.

ऊर्जामंत्री यांच्या दुर्लक्ष्या मुळे वीज कंत्राटी कामगारांना न्याय मिळत नाही, कंत्राटतदार मुजोर झाले असून प्रशासन हातमिळवणी करून त्यांना सहकार्य करत असल्याचे चित्र सबंध महाराष्ट्रभर दिसत आहे , या दोषी कंत्राटदार ना ब्लँक लिस्टमध्ये टाकत नाही तो पर्यंत महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघ राज्य भर करून शासनाचे लक्ष वेधून कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी उपोषण, धरणा, मोर्चा ई .आंदोलन करणार असल्याचे माहिती महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघांचे( संलग्न भारतीय मजदूर संघ) अध्यक्ष निलेश खरात व सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी दिली.

Previous articleछत्रपती शिवाजी महाराज जगाचे ऊर्जा स्रोत-शशिन कुंभोजकर
Next articleसरपंच परिषदेचे उपाध्यक्ष शशिकांत मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त संपर्क बालग्राम अनाथ आश्रमात मुलांना फळ व खाऊ वाटप