सायन्स ऑलिंम्पियाड फाउंडेशन परीक्षेत यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना यश ;परिक्षेचा निकाल १००%

.
मोसीन काठेवाडी,घोडेगाव

सायन्स ऑलिंम्पियाड फाउंडेशन आयोजित आंतरराष्ट्रीय परीक्षेत आंबेगाव वसाहत येथील यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालयातील एकोणतीस विद्यार्थी उत्तीर्ण होऊन परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागल्याची माहिती मुख्याध्यापक अविनाश ठाकूर यांनी दिली.

माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील हे संस्थापक अध्यक्ष असलेल्या एन.सी. आर.डी संस्थेच्या यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालयातील एकोणतीस विद्यार्थी सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशनच्या आंतरराष्ट्रीय परीक्षेस बसले होते,त्यापैकी इयत्ता पाचवी व इयत्ता सहावीचे अठरा विद्यार्थी गणित ऑलिम्पियाड परीक्षेत उत्तीर्ण होऊन अकरा विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय गोल्ड मेडल मिळाले. इयत्ता सातवी मधील सहा विध्यार्थी सायन्स ऑलिम्पियाड परिक्षेत उत्तीर्ण होऊन एका विद्यार्थ्याला गोल्ड मेडल मिळाले तर इ.नववी मधिल सात विद्यार्थी इंग्रजी ऑलिम्पियाड परीक्षेत उत्तीर्ण होऊन एका विद्यार्थीनीस गोल्ड मेडल मिळाले.

आंतरराष्ट्रीय गोल्ड मेडल ऑफ एक्सेलेन्स मिळवलेले विद्यार्थी –
तनया विष्णू काळे,मनस्वी संतोष पिंगळे,निरंजन श्रीपाद काळे,समर्थ प्रमोद पिंपळे,रेहान आरिफ पानसरे,आदेश गणेश विधाटे, शिवप्रसाद विठ्ठल मोरे,दिक्षा विनायक घोडेकर,अथर्व दिलीप भवारी,आर्या पिंटू करे,दिया बाळू भोर,पार्थ रावसाहेब सोमवंशी,धनश्री संतोष शेंगाळे.या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना माणिक हुले,लक्ष्मी वाघ, निलम लोहकरे,गौरी विसावे यांनी मार्गदर्शन केले.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन संस्थेचे उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे, माजी सभापती प्रकाशराव घोलप, आंबेगाव गावठाण ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच प्रमिला घोलप,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजाभाऊ घोलप यांनी केले.

Previous articleचोरी करून चोरट्याने दुकान पेटवले : पाटस येथील घटना
Next articleएमटीडीसीच्या पर्यटक निवासांमध्ये वाचनालये सुरू होणार