एमटीडीसीच्या पर्यटक निवासांमध्ये वाचनालये सुरू होणार

पुणे – अष्टाविनायकांपासून ते पंढरपूर पर्यंत अनेक धार्मि‍क स्थळे, निसर्गाव्दारे वरदान लाभलेली संपदा, गडकिल्ले, ओसंडून वाहणारे धबधबे, नदया, सागरी किनारे, नागमोडी वळणे असलेले घाट, पारंपारिक संस्कृति, खादयसंस्कृति अशा विशिष्ठ वैशिष्ठयांमुळे आज महाराष्ट्रामध्ये देशभरातून नव्हे तर जगभरातून पर्यटकांचा राबता दिसता, पाउलखुणा दिसतात.

पर्यटनाचे सकारात्मक परिणाम वाढवणेकरिता तसेच नकारात्मक परिणामांना आळा घालणेकरिता, ते कमी करणेकरिता एक साधा आणि वाखणण्याजोगा उपाय म्हणजे जबाबदार पर्यटन, जे आज संपूर्ण जगभरात पुष्कळ ठिकाणी स्विकारले गेले आहे. जबाबदार पर्यटन या संकल्पनेचा मुळात उददेश हाच आहे कि सर्व भागीदारांमध्ये जबाबदार पर्यटन स्विकारण्याच्या दृष्टीने जागृती निर्माण करणे. आजच्या स्पर्धात्मक युगात पर्यटन व्यवसाय खुप वाढीस लागला असून पर्यटनाला खुप चालना मिळाली आहे. पर्यटनाबरोबरच आपला सांस्कृतिक वारसा आणि परंपरा जोपासणे आवश्यक आहे. या परंपरांची आणि वारशाची इत्यंभुत माहीती पर्यटकांना आणि येणाऱ्या नवीन पिढीला असणे आवश्यक आहे. याचाच एक भाग म्हणुन वाचन संस्कृती वाढीस लागणे आवश्यक असल्याचे दिसुन येत आहे. मुलांना मोबाईल आणि केबलच्या आभासी जगातुन बाहेर काढुन आपल्या समृध्द असलेल्या भारतीय परंपरेची ओळख ही वाचन परंपरेतुन करुन देता येणार आहे.

महाराष्ट्र राज्यातील महामंडळाच्या सर्व पर्यटन स्थळावरील हॉटेल्स, रिसॉर्ट या ठिकाणी ऐतिहासिक माहिती, महाराष्ट्रातील पर्यटनाविषयी माहिती, संतांची माहिती, क्रांतीकारांची माहिती, हिंदी/इंग्रजी/मराठी या भाषांमधील इतर साहित्य इ. महत्वाच्या विषयांची पुस्तके मोठया प्रमाणांत पर्यटकांना उपलब्ध करुन देणे बाबत पुढील आवश्यक ती कार्यवाही 15 दिवसांत करावी, अश्या आशयाच्या सुचना श्री. मंगलप्रभात लोढा, मा. मंत्री, पर्यटन, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता, महिला व बालविकास, महाराष्ट्र शासन यांनी दिल्या आहेत.

महामंडळ परिचलन करीत असलेल्या पर्यटक निवासामध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी त्यांचा वास्तव्याचा कालावधी मनोरंजनात्मक व अविस्मरणीय व्हावा. तसेच पर्यटकांच्या आयुष्यात सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, वैज्ञानिक तसेच सामान्य ज्ञानात अधिकाअधिक भर पडण्याच्या दृष्टीकोनातुन महामंडळामध्ये वाचनालय / ग्रंथालय सुरु करण्याचे नियोजन आले होते. प्रादेशिक स्तरावर व काही पर्यटक निवासे येथे वाचनालय सुरु देखील करण्यात आले आहेत.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ पर्यटन आणि निसर्ग यांसाठी विशेष प्रयत्न करीत आहे. त्यास अनुसरुन महामंउळाच्या सर्वच पर्यटक निवासांमध्ये तृणधान्याचे पदार्थ उपलब्ध करुन देण्याबरोबरच जबाबदार पर्यटनाची संकल्पना अंगिकारण्यात येत आहे.

महामंडळाच्या उपहारगृहांमध्ये स्थानिक खादयपदार्थांना प्रोत्साहन दिले जात असुन पर्यटकांचे मन मोहून टाकणारे स्थानिक खादयपदार्थ जसे की पिठले, उसळ, काळा मसाला असे खास पदार्थ पाहुण्यांना सुचविण्यात येणार असुन स्थानिक पाककृतीच्या चवींचा आणि विशिष्टतेचा आनंद पर्यटकांना देण्यात येत आहेत. यास अनुसरून प्रत्येक पर्यटक निवासात पुरेपुर विचार करून सदर मुल्ये प्रत्यक्षरित्या अंमलात आणणार असुन पर्यटकांचे आदरातिथ्य जबाबदार पर्यटन या संकल्पनेस अनुसरून MTDC ची पर्यटकांची मनामध्ये असलेली प्रतिभा अजुन उंचावणार आहोत. प्लॅस्टिक प्रदुषण कमी करताना निसर्गाचे भान ठेवुन कचरा न करणे आणि पर्यावरणाची स्वच्छता ठेवणे या बाबी कटाक्षाने करण्यात येत आहेत.

पर्यटक निवासांच्या ठिकाणी वाचनालय सुरु करण्याबाबत सर्व वरिष्ठ / प्रादेशिक व्यवस्थापक व पर्यटक निवास व्यवस्थापक यांना महामंडळाच्या व्यवस्थापकिय संचालक श्रीमती श्रध्दा जोशी शर्मा यांनी निर्देशित केले आहे. वाचनालय / ग्रंथालय सुरु करण्यासाठी सुयोग्य पर्यटक निवासे येथील जागेची त्वरीत पाहणी करुन ग्रंथालय सुरु करण्यात येणार आहेत. सुरु करण्यात आलेल्या वाचनालय / ग्रंथालयात महाराष्ट्रातील पर्यटनाविषयी माहिती, संतांची माहिती, क्रांतीकारांची माहिती, हिंदी/इंग्रजी/मराठी या भाषांमधील इतर साहित्य इ. महत्वाच्या विषयांची पुस्तके मोठया प्रमाणांत पर्यटकांना वाचनाकरिता सहजरित्या उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

महामंडळाच्या अंतर्गत असलेल्या पर्यटक निवास छत्रपती संभाजीनगर, महाबळेश्वर या ठिकाणी वाचनालये सुरु करण्यात आली आहेत. आगामी काळात पर्यटक निवास लोणार, पर्यटक निवास फर्दापुर या ठिकाणीही वाचनालय / ग्रंथालय सुरु करण्यात येणार आहेत. लहान मुले आणि जेष्ठ नागरिक असलेल्या पर्यटकांसाठी ही वाचनालये माहीतीची पर्वणी ठरणार आहेत. वाचनाबरोबरच निसर्गाचा समतोल साधत पर्यटनाचा पुरेपुर आनंद घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक श्री. दिपक हरणे यांनी केले आहे.

Previous articleसायन्स ऑलिंम्पियाड फाउंडेशन परीक्षेत यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना यश ;परिक्षेचा निकाल १००%
Next articleविठाबाई नारायणगावकर यांच्या तमाशाच्या व्यासपीठावर थेट बैलगाडा : समई नृत्य सादर करून संध्या माने यांनी मिळवली रसिकांची वाहवा