चोरी करून चोरट्याने दुकान पेटवले : पाटस येथील घटना

दौंड तालुक्यातील पाटस येथील फर्निचर दुकानाचा पत्रा कापून पंधरा हजारांच्या तांब्याच्या तारा चोरून अज्ञात चोरट्याने चार दुकानांना आग लावली. या आगीत एकूण ४५ लाख २० हजार रुपयांचे नुकसान झाले असून सतिष दशरथ कुसकर यांनी या बाबत यवत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटस हद्दीतील पुणे-सोलापुर हायवे रोडला फिर्यादी यांचे नागेश्वर फर्निचर नावाचे पत्राचे दुकान आहे. बुधवार (ता.१९) रोजी पहाटे दोन – तीनच्या सुमारास अज्ञातांनी त्या दुकानाच्या मागील बाजूचा पत्रा कापुन दुकानात प्रवेश केला. नंतर फर्निचर दुकानाचा पत्रा कापून लगतच्या योगेश सुरेश कोंडे यांच्या दुकानाचा पत्रा कापुन त्या दुकानामध्ये प्रवेश करून त्यांच्या दुकानातील अंदाजे पंधरा हजार रुपये किंमतीच्या तांब्याच्या तारांची चोरी केली.

यावेळी फर्निचरच्या दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे असल्याने कॉम्प्युटरची हार्डडिक्स काढून त्याच ठिकाणी पेटून दिली. चोरट्यांनी फिर्यादी सतिष कुसकर तसेच योगेश सुरेश कोंडे, मारूती बाबु सातपुते आणि संजय गाढवे यांच्या दुकानाला आग लावली.

रस्त्याने ये जा करणाऱ्या प्रवाशांनी दुकानाच्या दर्शनी भागात असलेल्या मोबाईल नंबर संपर्क साधून दुकान मालकांना आगीची माहिती दिली. यानंतर कुरकुंभ औद्योगिक वसाहतीच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. पाटसचा वीज पुरवठा खंडित करून आगीवर एक तासानंतर नियंत्रण मिळवले.
नोव्हेंबर २०२२ मध्ये त्याच दुकानामध्ये एकाच पद्धतीने चोरीची घटना घडली होती. याबाबत यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर घटनास्थळी माजी आमदार रमेश थोरात यांनी भेट देत पोलीस विभागाला तातडीने तपास करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Previous articleनारायणगाव यात्रेत राहुल माळीने मनमाडच्या सचिन सुरनरला चितपट करत १ लाख ₹ इनामाची अंतिम कुस्ती जिंकली
Next articleसायन्स ऑलिंम्पियाड फाउंडेशन परीक्षेत यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना यश ;परिक्षेचा निकाल १००%