श्रम क्षेत्राला दिशा देणारे भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कुरकुंभ : सुरेश बागल

७ ते ९एप्रिल २०२३ या कालावधीत पटणा बिहार येथे होणार अधिवेशन
कामगारांच्या हितासाठी प्रस्ताव मांडणार
भारतीय मजदूर संघाचे पटणा बिहार येथील राष्ट्रीय अधिवेशन श्रमीक जगाला नवी दिशा देणारे असेल तसेच कामगारांच्या प्रश्नांवर , कामगारांच्या विविध मागण्यांसाठी प्रस्ताव, ठराव करण्यात येणार आहे, अशी माहिती भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय महामंत्री रविंद्र हिमते यांनी दिलेली आहे.

अधिवेशना बाबतीत सविस्तर माहिती पटणा येथील मर्चा- मिरची रोड येथील केशव सरस्वती विद्या मंदिर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली आहेे

.
भारतीय मजदूर संघाचे २० वे राष्ट्रीय अधिवेशन ७ ते ९एप्रिल २०२३पटणा बिहार येथे होत आहे. बिहार मध्ये हे दुसरे राष्ट्रीय अधिवेशन होत आहे या करिता संपूर्ण देशभरातील सर्व राज्यातील विविध ऊद्योगातील ४० महासंघाचे २००० पेक्षा जास्त प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. अधिवेशनात संघटीत, असंघीटत क्षेत्रातील महिलांचा सहभागी होणार आहेत.

अधिवेशना चे उद्घाटन केंद्रीय संसंदीय कार्य, कोयला मंत्री मा प्रल्हाद जोशी, विषेश उपस्थित म्हणून श्री. सईद सुल्तान उद्दीन अहमद (मजदूर क्षेत्रातील विशेषज्ञ, आ ऐल ओ दक्षिण अशिया ) अध्यक्ष हिरण्यमय पंड्या (अध्यक्ष भारतीय मजदूर संघ) उपस्थित रहाणार आहेत.
या अधिवेशनामध्ये कामगारांच्या विविध विषयांवर ४ प्रस्ताव पारित करणार आहे या व्यतिरिक्त महासंघाचे प्रस्ताव मांडणार आहे.
८ एप्रिल रोजी महिला कार्य और सहभागीता या विषयावर सत्रात अध्यक्षता श्रीमती निशा चौबे (उपाध्यक्ष भारतीय मजदूर संघ) श्री. मती सिता साहु (महापौर पटना) आशा लकडा (जनजाती विशेषज्ञ रांची झारखंड) श्री मती प्रझा परांडे (सल्लागार वी वी गिरी श्रमीक संस्थान) उपस्थित रहाणार आहेत .

८ एप्रिल २०२३ ला पटना सिटी मध्ये शोभायात्रा विविध मार्गांनी जावून समारोप खुला अधिवेशनाने होणार आहे.
पत्रकार परिषद ला राष्ट्रीय अध्यक्ष हिरण्यमय पंड्या, रविंद्र हिमते राजेश कुमार लाल, सरचिटणीस संजय कुमार सिन्हा उपस्थित होते.

महाराष्ट्रातील संघटीत व असंघीटत क्षेत्रातील कामगारांच्या न्याय हक्कांच्या मागण्या करिता कामगार प्रतिनिधी, महासंघाचे पदाधिकारी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री अनिल ढुमणे व महामंत्री मोहन येणूरे यांच्या नेतृत्वाखाली पटणा बिहार येथे उपस्थित रहाणार आहेत. अशी माहिती अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाचे सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी दिली आहे.

Previous articleघोडेगाव येथील आठवीच्या कु. वरद विधाते विद्यार्थ्यांने काढले महाकाली देवीचे अप्रतिम चित्र
Next articleकानसे मध्ये श्री काळभैरवनाथांचा यात्रामहोत्सव उत्साहात संपन्न