कीर्ती घाटगे हिची अखिल भारतीय आंतर विद्यापीठ क्रिकेट स्पर्धेसाठी निवड

प्रतिनिधी मोसीन काठेवाडी

घोडेगाव येथील आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचालित बी.डी.काळे महाविद्यालयातील प्रथम वर्ष बी.बी.ए.या वर्गातील खेळाडू कु.कीर्ती राजेंद्र घाटगे हिची दिनांक ५ ते ११ एप्रिल 2023 दरम्यान म्हैसूर (कर्नाटक) येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ महिलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या क्रिकेट संघाच्या भूवनेश्वर(ओडिसा) येथे झालेल्या आंतरविद्यापीठ स्पर्धेतून म्हैसूर येथे निवड झाल्याची माहिती प्रभारी प्राचार्य डॉ.ज्ञानेश्वर वाल्हेकर यांनी दिली आहे.

नुकत्याच भुवनेश्वर (ओरिसा) येथे झालेल्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ क्रिकेट स्पर्धेत कीर्ती हिने उत्कृष्ठ गोलंदाजी करीत तिने संघात स्थान पक्के केले. या स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संघाने उपविजेतपद मिळविले.या स्पर्धेतूनच तिची अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. कु.कीर्ती हिला क्रीडा संचालक प्रा. भाऊसाहेब थोरात यांनी मार्गदर्शन केले .

या उज्वल यशाबद्दल आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष श्री.तुकाराम काळे,सचिव श्री.अक्षयशेठ काळे, कार्याध्यक्ष श्री.शामशेठ होनराव, महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन ॲड.मुकूंद काळे, संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, संचालक, सल्लागार तसेच प्रभारी प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर वाल्हेकर,उपप्राचार्य डॉ.बाळासाहेब गव्हाळे, महविद्यालयाचे सर्व प्राध्यापक यांनी तिचे हार्दिक अभिनंदन केले आहे.

Previous articleघोडेगाव येथे सेवानिवृत्त प्राध्यापकाची १० लाख ९८ हजाराची ऑनलाईन फसवणूक
Next articleभरदार पिकअपची दोन मोटार सायकलला जोरदार धडक ; पाच जणांचा अपघातात मृत्यू