घोडेगाव येथे सेवानिवृत्त प्राध्यापकाची १० लाख ९८ हजाराची ऑनलाईन फसवणूक

 मोसीन काठेवाडी

घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील सेवानिवृत्त प्राध्यापकाची तब्बल १० लाख ९८ हजार ९९८ रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली असल्याची घटना दिनांक २५/३/२०२३ ते २७/३/२०२३ चे दरम्यान घडली आहे. याप्रकरणी सुमित शिंदे नावाच्या व्यक्तीवर घोडेगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबतची फिर्याद इंद्रजीत भाऊराव जाधव वय ६४ यांनी दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी सुमित शिंदे यांने फिर्यादी इंद्रजीत जाधव यांना फोन आणि मेसेज करून बँकेतून बोलतोय असे सांगून दिशाभूल करत मोबाईल फोनवर आलेला ओ.टी.पी. विचारून इंद्रजित जाधव यांच्या खात्यावरील एकूण १०,९८,९९८/- रुपये विविध खात्यांवर ऑनलाईन वर्ग करून घेतले आहेत. पुढील तपास स. पो. निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पो उपनिरीक्षक मगदूम हे करत आहे.

ऑनलाइन पद्धतीने अनेक ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक होत असून नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन घोडेगाव पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष अधिकारी साहायक पोलिस निरीक्षक जीवन माने हे वेळो वेळी करत आहे.

ऑनलाइन फसवनुक कशी होते

कोणतीही बँक कोणत्याही कारणासाठी ग्राहकांना फोन करत नाही तसेच ओटीपी मागणी करत नाही त्यामुळे सर्वांनी बँकिंग संदर्भातले फोन कॉल्स टाळावेत व त्या नंबरला रिपोर्ट करावे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक सुंदर दिसणाऱ्या तरुणींचे फोटो वापरून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली जाते व त्यानंतर अश्लील व्हिडिओ कॉल करून समोरच्या व्यक्तीला सुद्धा कपडे काढण्यासाठी प्रेरित केले जाते व समोरच्या व्यक्तीने कपडे काढले की त्याचे रेकॉर्डिंग करून नंतर त्याला ब्लॅकमेल केले जाते. हा सेक्सटोरशनचा प्रकार असून याला कोणीही बळी पडू नये अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नयेत.

जगामध्ये काहीही फुकट मिळत नाही त्यामुळे फेसबुक किंवा इतर सोशल मीडिया मधून अत्यंत स्वस्त दरामध्ये वस्तू मिळण्याचे आम्हीच दाखवून जर कोणी पैशाची मागणी करत असेल तर तो फ्रॉड आहे हे ओळखून त्याच्यासोबत कोणताही व्यवहार करू नये.

आर्मी मधील अधिकारी आहे आणि आता बदली झाल्यामुळे गाडी किंवा फर्निचर घरातील साहित्य विक्री करायचे आहे किंवा आर्मी मधील जवान आहेत त्यांना हॉटेलमधून जेवणाची ऑर्डर पाहिजे म्हणून हॉटेल व्यवसायिकांशी ऑनलाइन फसवणूक केली जाते त्यापासून सुद्धा सावध राहावे.

ऑनलाइन लोन ॲप याच्यामध्ये मधून सुद्धा मोठ्या प्रमाणावर बेरोजगार तरुणांची फसवणूक होते व प्रचंड मोठ्या व्याजदराने त्यांना पाच दहा हजार रुपयांची कर्ज देऊन त्यांच्याकडून लाखो रुपये वसूल केले जातात त्यामुळे कोणत्याही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून कर्ज घेऊ नये व घेतले असल्यास त्याबाबत आपली फसवणूक टाळावी

Previous articleकोलदरा येथे रक्तदान शिबीर मोठ्या उत्साहात संपन्न
Next articleकीर्ती घाटगे हिची अखिल भारतीय आंतर विद्यापीठ क्रिकेट स्पर्धेसाठी निवड