कोलदरा येथे रक्तदान शिबीर मोठ्या उत्साहात संपन्न

मोहसीन काठेवाडी, घोडेगाव

शिव संस्कृती प्रतिष्ठान कोलदरे,कोलदरे ग्रामविकास संस्था,समस्त ग्रामस्त कोलदरे व ग्रामपंचायत कोलदरे/गोनवडी आयोजित भव्य रक्तदान शिबीर कोलदरे ता.आंबेगाव येथील वडजुमाता संस्कार केंद्रात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.


रक्तदान हेच श्रेष्ठ दान या युक्तीप्रमाणे तरुणांनी या शिबीरात सक्रीय सहभाग नोंदवला.यावेळी सुनिल राठोड,संकेत बारवे यांचे विशेष सहकार्य लाभले. कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी महेश काळे यांनी देखिल स्व:ता रक्तदान केले. यावेळी एकूण ८७ इतक्या रक्तदात्यांनी रक्तदान केले.

या प्रंसगी पंचायत समितीचे माजी सभापती कैलासबुवा काळे,शरद सहकारी बँकेचे संचालक सुदाम काळे,कोलदरा गोनवडीचे सरपंच तेजस काळे तसेच अनेक मान्यवरांनी भेट दिली.

Previous articleशिनोली येथे वनविभागाच्या वतीने डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी योजनेच्या लाभार्थ्यांना साहित्य वाटप तसेच नूतन निवासस्थानाचे उद्घाटन संपन्न
Next articleघोडेगाव येथे सेवानिवृत्त प्राध्यापकाची १० लाख ९८ हजाराची ऑनलाईन फसवणूक