वेगरेच्या सरपंचांचे अखेर सदस्यपद रद्द : पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा आदेश

पौड- वेगरे (ता.मुळशी) येथील सरपंचांवर मोठी कारवाई झाली असून अखेर त्यांचे सदस्यत्वही रद्द करण्यात आल्याचा आदेश नुकताच  दिला आहे .पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 40(1 अ व 2) अन्वये मिनाथ मारुती कानगुडे यांचे सदस्यपद रद्द करण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, वेगरे ग्रामपंचायतीच्या 29 एप्रिल 2022 च्या तहकूब ग्रामसभेत माजी सरपंच भाऊ मरगळे यांनी मागील सभेचे प्रोसेडिंग विचारलेच्या कारणावरून तत्कालीन सरपंच तथा सभेचे अध्यक्ष कानगुडे व त्याच्या साथीदारांनी भाऊ मरगळे यांच्या वर दगड, दांडके, सुरा व कोयत्याने साहाय्याने जीवघेणा हल्ला करून जखमी केले होते .व उपचारासाठी दवाखान्यात घेऊन जात असताना देखील कानगुडे याच्या साथीदारांनी मरगळे यांची गाडी अडवून फोडली होती.याबाबत पौड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद झालेवरून कानगुडे व त्याच्या साथीदारांना 30 एप्रिल 2022 रोजी अटक करण्यात आली होती तेव्हापासून ते सहा महिने येरवडा कारागृहात होते. जिल्हा न्यायालयाने त्यांचा दोन वेळा जामीन अर्ज फेटाळल्या नंतर मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना ऑक्टोबर 2022 मध्ये जामीन मंजूर केला परंतु पुढील आदेश होइपर्यंत वेगरे गावात येण्यास मनाई केली आहे.त्यामुळे ते मे 2022 ते ऑक्टोबर 2022 मध्ये झालेल्या वेगरे ग्रामपंचायतीच्या सलग सहा मासिक सभांना अनुपस्थित होते व त्या कालावधीत एकदाही गावात आले नाहीत.

यामुळे वेगरेचे माजी सरपंच भाऊ पांडुरंग मरगळे यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 40 (1अ ,व 2) नुसार कानगुडे यांचेवर कारवाई व्हावी यासाठी 2 सप्टेंबर 2022 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक जिल्हा परिषद पुणे यांचे कडे लेखी अर्ज देऊन तक्रार केली होती.त्यानुसार पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी ग्रामपंचायत वेगरेच्या चौकशीचे आदेश दिले होते .

याबाबत गट विकास अधिकारी मुळशी यांनी चौकशी करून सविस्तर अहवालदिनांक 10 ऑक्टोबर 2022 रोजी जिल्हा परिषद पुणे यांचेकडे सादर केला .यानुसार 9 नोव्हेंबर 2022 व 11 जानेवारी 2023 रोजी याबाबत प्रत्यक्ष सुनावणी घेण्यात आली.यावेळी कानगुडे यांच्या वतीने वकिलांनी म्हणणे मांडले तर मरगळे यांनी स्वतः युक्तिवाद केला .

सबब उपरोक्त कारणमीमांसाचा विचार करून पुणे जिल्हा परिषदेचे प्रशासक आयुष्य प्रसाद यांनी ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 40(1 अ ,2) नुसार दिनांक 15 फेब्रुवारी 2023 पासून मिनाथ मारुती कानगुडे यांना वेगरे गावचे सदस्यपदी राहणेस अपात्र ठरविले आहे

यावेळी भाऊ मरगळे म्हणाले सदरचा निकाल 60 दिवसात देणे बंधनकारक असतानाही तब्बल 150 दिवसांनी उशिरा का होईना आदेश दिलेबद्दल सदरच्या निकालावर समाधान व्यक्त केले.

Previous articleप्रा. डॉ. जे. पी. भोसले यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार
Next articleउरुळी कांचन येथील पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयात राष्ट्रीय एकात्मता कार्यशाळा संपन्न