उरुळी कांचन येथील पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयात राष्ट्रीय एकात्मता कार्यशाळा संपन्न

उरुळी कांचन

आजीवन अध्ययन व विस्तार विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे व उरुळी कांचन (ता.हवेली) पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आजीवन अध्ययन विस्तार कार्यक्रम अंतर्गत राष्ट्रीय एकात्मता कार्यशाळा संपन्न झाली. शरदचंद्रजी पवार महाविद्यालय जेजुरी येथील प्राचार्य डॉ. धनाजी नागणे यांनी प्रमुख वक्ते म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या व्याख्यानातून विद्यार्थ्यांना महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल , छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा महापुरुषांचे चरित्र वाचा व त्यातून खऱ्या अर्थाने राष्ट्रीय एकात्मता म्हणजे काय याची जाणीव होईल असे प्रबोधन पर मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेत प्रा. बंडू उगाडे यांनी राष्ट्रीय एकात्मतेवर दुसरे पुष्प गुंफून सखोल असे मार्गदर्शन केले . या कार्यशाळेत एकूण ९३ विद्यार्थ्यांनी सहभाग उस्फूर्तपणे नोंदवला. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. ए. भगत सर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन व प्रस्ताविक आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे समन्वयक प्रा. डॉ.निलेश शितोळे केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शुभांगी रानवडे, तर आभार कुमारी प्रतीक्षा मूल्या हिने मानले. अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा. नंदकिशोर मेटे, उपप्राचार्य डॉ. अविनाश बोरकर, प्रा. अंजली शिंदे, प्रा.विजय कानकाटे, प्रा.भाऊसाहेब तोरवे उपस्थित होते. श्री प्रदीप राजपूत, श्री. मोरेश्वर बगाडे, श्री. विशालदीप महाडिक यांनी विशेष सहकार्य केले.

Previous articleवेगरेच्या सरपंचांचे अखेर सदस्यपद रद्द : पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा आदेश
Next articleदौंड तालुक्यातील चौफुला येथे चार चाकी गाडीची काच फोडून पन्नास हजार व कागदपत्रांची चोरी