मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाकूर पिंपरी येथील अनाथाश्रमात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

चाकण- महाराष्ट्राचे कार्यसम्राट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाकूर पिंपरी येथील अनाथाश्रमात खाऊवाटप व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हातून महाराष्ट्राची प्रगती व सर्वांची सेवा घडो व त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी सर्व चिमुकल्यांनी प्रार्थना केली.

यावेळी माजी सभापती सौ. ज्योतीताई केशव आरगडे , शिरोली ग्रामपंचायत सदस्य संतोष खरपासे, शिवसैनिक विशाल टाकळकर, सागर खैरनार, सनी जाधव, सोनल घुमटकर, योगेश पवार व कार्यकर्ते उपस्थित होते,

Previous articleशशिकांत वारीशे यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी मुंबईतील पत्रकार काळ्या फिती लावून निदर्शने करणार
Next articleमा. प्रसन्न श्री’ ठरला महाळुंगे चा रमेश महाळुंगकर पहिल्या सहामध्ये…