कै. भाऊसाहेब भागवत विद्यालयामध्ये शारीरिक शिक्षण दिन उत्साहात संपन्न

दिनेश पवार:दौंड:प्रतिनिधी

कै.भाऊसाहेब भागवत माध्यमिक विद्यालयामध्ये शारीरिक शिक्षण दिन व वार्षिक क्रीडा स्पर्धांच्या मोठ्या उत्साहात पार पडल्या या कार्यक्रमाचे उदघाटन दौंडचे गटविकास अधिकारी अजिंक्य येळे व दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील संस्थेचे अध्यक्ष महेश भागवत यांच्या हस्ते झाले, दोन्ही अधिकारी हे स्वतः खेळाडू असल्याने त्यांनी उदघाटन प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन करून प्रेरित केले.

जीवनामध्ये हार-जित पचविण्याची ताकत फक्त खेळामधून निर्माण होते. खेळामधून समय सूचकता, सांघिक भावना, आरोग्याचा विकास,नेतृत्व गुण,आनंदी जीवन जगण्याचा मार्ग.अशा पद्धतीचे फायदे होत असतात. याप्रसंगी महेश भागवत यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन करून स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

स्पर्धेचे नियोजन दौंड तालुका क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष जे. एन. आवारी सर यानी केले होते. विविध खेळाच्या स्पर्धा या प्रसंगी घेण्यात आल्या. विद्यालयाचे मुख्याध्यापक येडे सर यांनी सर्व पाहुण्यांचे आभार मानले.

Previous articleकिवळे येथील हिंदूवीर प्रतिष्ठान आयोजित किल्ले बनवा स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न
Next articleनारायणगावात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा