नारायणगावात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

नारायणगाव : (किरण वाजगे)

नारायणगाव येथे ठिकठिकाणी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने ग्रामपंचायत नारायणगाव च्या वतीने संपूर्ण गावामध्ये तिरंगी रंगाच्या पताका लावण्यात आल्या होत्या. तसेच छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वारावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. नारायणगाव ग्रामपंचायतचे सरपंच योगेश पाटे, उपसरपंच आरिफ आतार, माजी उपसरपंच संतोष वाजगे यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य कर्मचाऱ्यांसह प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त जल्लोष करत नृत्य सादर केले.

नारायणगाव येथील ग्रामोन्नती मंडळाचे गुरुवर्य रा.प.सबनीस विद्यामंदिर येथेही राष्ट्रीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
ग्रामोन्नती मंडळाचे संचालक अल्हाद खैरे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.

याप्रसंगी ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटे, कार्याध्यक्ष कृषिरत्न अनिलतात्या मेहेर,उपाध्यक्ष सुजित खैरे,कार्यवाह रवींद्र पारगावकर यांसह सर्व विश्वस्त,संचालक, विविध विभागांचे विभाग प्रमुख, पालक,शिक्षक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्याध्यापिका अनुराधा पुराणिक यांनी गणराज्य दिनाची प्रतिज्ञा आणि प्राचार्य डॉ.राहुल गोंगे यांनी संविधान प्रस्ताविकेचे वाचन केले.

एनसीसी विभाग प्रमुख डॉ. दिलीप शिवणे, रोहित भागवत, स्काऊट गाईड विभागाचे प्रमुख अजय कलढोणे,सुनिल ढवळे,वैशाली बेल्हेकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली छात्रसैनिकांनी ध्वजाला मानवंदना दिली.

सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत गुरुवर्य रा.प. सबनीस विद्यामंदिर, श्री.अनंतराव कुलकर्णी इंग्लिश मीडियम स्कूल,कला वाणिज्य,विज्ञान महाविद्यालय, ग्रामोन्नती मंडळाचे बीएड कॉलेज, श्रीमती एस.आर.केदारी बालक मंदिर,उमाजी दगडूजी तांबे बालनिकेतन यांमधील विद्यार्थ्यांनी नृत्य,विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

ग्रामोन्नती मंडळाच्या विविध विभागातील राज्य,राष्ट्रीय पातळी वरील यशस्वी खेळाडूंना यावेळी मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा प्रमुख भीमराव पालवे व बबन गुळवे यांनी केले

Previous articleकै. भाऊसाहेब भागवत विद्यालयामध्ये शारीरिक शिक्षण दिन उत्साहात संपन्न
Next articleवीज ऊद्योगातील कंत्राटी कामगारांचे प्रश्नां बाबतीत भारतीय मजदूर संघ ऊतरला रस्त्यावर