शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कानगाव येथे स्वच्छता अभियान

 योगेश राऊत , पाटस

दौंड तालुक्यातील कानगाव येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना दौंड विधानसभा व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सोमवार (ता.२३) रोजी स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

यावेळी पुणे जिल्हा प्रमुख महेश दादा पासलकर यांच्या वतीने कानगाव येथे गावातील अंतर्गत रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली. कानगाव मधील मुख्य रस्ता, अंतर्गत रस्ते, बाजार मैदानाची साफसफाई करण्यात आली.

या वेळी शिवसेना विभाग प्रमुख हनुमंत निगडे, शिवसेना उपविभाग प्रमुख राहुल फडके, शिवसेना युवा उपजिल्हाधिकारी योगेश फडके, कानगाव शाखाप्रमुख भरत फडके, सुनील गवळी हरी फडके, उपशाखाप्रमुख पांडुरंग शेळके व कानगाव ग्रामस्थ व शिवसैनिक उपस्थित होते.

Previous articleतालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात संस्कार प्रायमरी आणि हायस्कूलचे उल्लेखनीय यश
Next articleभीमा नदीपात्रात पाच दिवसात एकाच कुटुंबातील आढळले चार जणांचे मृतदेह ; ३ लहान मुले बेपत्ता