तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात संस्कार प्रायमरी आणि हायस्कूलचे उल्लेखनीय यश

दिनेश पवार:दौंड:प्रतिनिधी:

पुणे जिल्हा परिषद पुणे अंतर्गत दौंड तालुक्यातील स्वामीचिंचोली येथे दत्तकला इंटरनॅशनल स्कूल मध्ये विज्ञान प्रदर्शन नुकतेच पार पडले.या मध्ये संस्कार प्रायमरी हायस्कूल मधील ओम संदीप गार्डी या विद्यार्थ्यांला मल्टी फंक्शनल अँग्री रोबोट या प्रकल्पाला माध्यमिक व उच्च माध्यमिकस्तरावर मोठ्या विद्यार्थी गटातून (इयत्ता ९ वी ते १२ वी)प्रथम क्रमांक प्राप्त झाला व त्याची जिल्हास्तरासाठी निवड झाली असून यावेळी त्याचा सन्मान दत्तकलाचे संस्थापक प्रा.रामदास झोळ,प्रा.माया झोळ,राना सूर्यवंशी,पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

या प्रकल्पाला मार्गदर्शन पाटील मॅडम,सना जिलानी व ठाकुर प्रदीपसिंह अजितसिंह यांनी केले.संस्थेचे संचालक जयंत पवार व शिक्षक यांनी त्यांचे अभिनंदन केले व त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी त्याला शुभेच्छां दिल्या.

Previous articleगुन्हेगारी प्रवृत्तीच्या कंत्राटदारांना अधिकारी वर्गाने अभय देवु नये: महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघाची मागणी
Next articleशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कानगाव येथे स्वच्छता अभियान