पुणे जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीबाबत गृहमंत्र्यांना पत्र लिहणार : खासदार सुप्रिया सुळे

 योगेश राऊत ,पाटस

पुणे जिल्ह्यात मागील तीन चार महिन्यात गुन्हेगारीमध्ये प्रचंड वाढ झाली असून एका दिवसानंतर नवीन घटना समोर येत आहेत. जिल्ह्यातील गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहणार असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

पाटस पोलीस चौकीमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवार (ता.१८) रोजी भेट देत प्रलंबित पोलीस स्टेशनबाबत ग्रामस्थांसोबत संवाद साधला. यावेळी खासदार सुप्रिया सुळे बोलत होत्या.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आप्पासाहेब पवार, पाटसचे सरपंच अवंतिका शितोळे, ग्रा.पं. सदस्य शितल चव्हाण, राहुल आव्हाड, प्रदीप दिवेकर, गणेश चव्हाण व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी पाटस पोलीस स्टेशनचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयात सादर केला असल्याचे सांगितले. तसेच पाटस पोलीस स्टेशनच्या प्रस्तावामधील गावांचा समावेश करताना तालुक्यातील भौगोलिक परिस्थितीचा विचार प्रशासनाने करावा अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पुणे विभाग अध्यक्ष वैशाली नागवडे यांनी केली आहे.

पुढे बोलताना खा. सुळे म्हणाल्या की, पुणे जिल्ह्यात गुन्हेगारी डोकेवर काढत आहे. जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीला राज्याचे गृह विभाग जवाबदार आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनात पुणे जिल्ह्यातील गुन्हेगारीबाबत प्रश्न उपस्थित केला होता. दौंड तालुक्यातील पाटस परिसरात वाढते औद्योगिकीकरण व त्यासोबत लोकसंख्या वाढीमुळे मोठया प्रमाणात गुन्हेगारी वाढत असल्याने पाटस येथील प्रलंबित पोलीस स्टेशनची मागणी त्वरित पूर्ण करण्यासाठी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी पाटस पोलीस चौकीमध्ये भेट देत पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी योग्य उपाय योजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

पाटस परिसरातील मार्गावर चार घाट आहेत. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील अपघात, चोऱ्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. राष्ट्रवादीच्या काळातील पाटस पोलीस स्टेशनचा प्रस्ताव भाजपच्या काळात धूळ खात पडला आहे. पाटसमध्ये प्रशस्त जागा उपलब्ध करून दिल्याने लवकरात लवकर पोलीस स्टेशन व्हावे अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे ग्रामस्थांनी केली आहे.
— शिवाजी ढमाले (संचालक, खरेदीविक्री संघ, दौंड)

Previous articleइतर राज्याप्रमाणे महाराष्ट्रात जातनिहाय स्वतंत्र जनगणना करा : विविध संघटना व पक्षाची मागणी
Next articleभोसे येथील खो खो खेळाडूंनी साकारली विजेतेपदाची हॅट्रिक