भोसे येथील खो खो खेळाडूंनी साकारली विजेतेपदाची हॅट्रिक

चाकण-  पुणे जिल्हा परिषद पुणे आयोजित यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव अंतर्गत शिवछत्रपती क्रीडा संकुल महाळुंगे – बालेवाडी पुणे येथे झालेला जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये खेड तालुक्यातील भोसे (ता.खेड) शाळेच्या मुलांच्या संघाने खो-खो क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांकाने जिल्हाअजिंक्यपद व मुलींच्या संघाने लहान गटात उपविजेते पद मिळविले तर लोकनृत्य या कलाप्रकारात तृतीय क्रमांक मिळविला अशी माहिती शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्री मुचकुंद जाधव यांनी दिली .

खेड तालुक्याचे प्रतिनिधित्व जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये करत असताना मुलांच्या संघाने सलग तिसरे अजिंक्यपद पटकावून आपले खो-खो क्रीडा स्पर्धेमधील वर्चस्व कायम राखले. तर मुलींच्या संघाने प्रथमच जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाने प्राविण्य मिळविले .यशस्वी संघातील खेळाडूंना खो – खो मार्गदर्शक रमेश लोणारी , रोहन सावंत व सर्व शिक्षक वृंदांनी मार्गदर्शन केले .

शालेय क्रीडा स्पर्धेतील विभागीयस्तरीय स्पर्धेमध्ये अजिंक्यपद पटकावून संपूर्ण संघ राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला.यानंतर जिल्हा विजेतेपद अशी दुहेरी स्वप्नपूर्ती झाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.

यशस्वी खेळाडू व मार्गदर्शक शिक्षकांना पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड , भोसे प्राथमिक शाळेचे माजी शिक्षक व ठाणे जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर , खेड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी जीवन कोकणे ,विस्ताराधिकारी अशोक गोडसे ,केंद्रप्रमुख संदिप जाधव , मुख्याध्यापिका नंदा पोतले यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले .

यावेळी भोसे गावचे सरपंच विजय काळे ,उपसरपंच रोहिणी पिंगळे ,माजी उपसरपंच दिगंबर लोणारी ,ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब बिंदले ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विकास गांडेकर ,उपाध्यक्ष दिगंबर कुटे ,संतोष गव्हाणे व सर्व सदस्य , दत्तराज गुंडगळ , गुलाब तांबोळी , आकाश लोणारी, अनिल कुऱ्हाडे,माजी मुख्याध्यापक दिपक धनवटे , समस्त ग्रामस्थ भोसे यांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले .

Previous articleपुणे जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीबाबत गृहमंत्र्यांना पत्र लिहणार : खासदार सुप्रिया सुळे
Next articleचिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीमुळे चंद्रकांत नखाते यांचे नाव चर्चेत.. ?