भारतीय पत्रकार संघाच्या वतीने दौंड येथे पत्रकार दिन साजरा

दिनेश पवार:दौंड:प्रतिनिधी

भारतीय पत्रकार संघ दौंड शहर व तालुक्याच्या वतीने दौंडमध्ये पत्रकार दिन साजरा करण्यात आला, यावेळी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.सदर कार्यक्रम पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष सिकंदर नदाफ,लीगल सेल राज्य उपाध्यक्ष कैलास पठारे,जिल्हा अध्यक्ष रमेश लेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 रोजी दर्पण हे वृत्तपत्र सुरू केले तेव्हा पासून हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो,दौंड शाखेच्या वतीने हा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला,तसेच काल बारामती येथे झालेल्या पुरस्कार सोहळ्यात भारतीय पत्रकार संघास आदर्श संघ म्हणून पुरस्कार मिळाला याबद्दल वरिष्ठांचे व सदस्यांचे कार्यक्रमात अभिनंदन करण्यात आले.

यावेळी दौंड तालुका अध्यक्ष सुभाष कदम,दिनेश पवार यांनी मनोगत व्यक्त केले,जेष्ठ पत्रकार राजेंद्र सोनवलकर यांची जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड झाल्याबद्धल दौंड शाखेच्या वतीने सन्मान करण्यात आला, कार्यक्रमानंतर दौंड रुग्णालयात फळे वाटप कार्यक्रम करण्यात आला. यावेळी पांडुरंग गडेकर,सदाशिव रणदिवे,सुदाम फासगे,विठ्ठल शिपलकर, जानी बाबा शेख,विजय जाधव,सुरेश बागल,विकी ओहोळ,धनश्री पागे,प्रदीप सुळ आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.

Previous articleपत्रकार दिनानिमित्त नजर फाउंडेशन यांच्या कडून पांढरेवाडी येथील विलास येचकर यांच्या हस्ते पत्रकारांना पेन व डायरी भेट देऊन सन्मान
Next articleपत्रकार दिनानिमित्त जुन्नर वन विभागाच्या वतीने पत्रकारांचा सन्मान