पत्रकार दिनानिमित्त नजर फाउंडेशन यांच्या कडून पांढरेवाडी येथील विलास येचकर यांच्या हस्ते पत्रकारांना पेन व डायरी भेट देऊन सन्मान

कुरकुंभ : प्रतिनिधी, सुरेश बागल

पांढरेवाडी (ता .दौंड ) फॉरेस्ट विभाग येथे पत्रकार दिनानिमित्त पोलीस पाटील यांच्या हस्ते उपस्थित पत्रकार कुरकुंभ लोकमतचे पत्रकार रिजवान मुलानी , पुण्यनगरी चे पत्रकार अनिल साळुंखे , महाराष्ट्र न्यूज १० चे पत्रकार आलिम सय्यद ,आवाज जनतेचा कुरकुंभ चे पत्रकार सुरेश बागल यांना पेन व डायरी भेट देऊन सन्मानित करण्यात आले.

बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी अन्यायाला वाचा फोडण्यासाठी दर्पण हे वृत्तपत्र सुरू केले. तो  दिवस पत्रकार दिवस म्हणून ओळखला जातो. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून पत्रकार हे दिवस रात्र काम करत असतात. अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पत्रकार दिवस-रात्र काम करत असतात .त्यासाठी आज आपण या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. असे पोलीस पाटील विलास येचकर यांनी सांगितले.

पांढरेवाडी फॉरेस्ट खाते येथे मागील एक वर्षापासून नजर फाउंडेशन यांच्या माध्यमातून झाडे लावण्याचे काम केलेले आहे. झाडे लावल्यानंतर झाडांचे संगोपन करणे हे नजर फाउंडेशन हे काळजीपूर्वक काम करत आहे झाडे लावा झाडे जगवा हा सरकारचा उपक्रम आम्ही खेडेगावात राबवत आहोत असे नजर फाउंडेशनचे सचिव सचिन निंबाळकर यांनी सांगितले.

यावेळी पांढरेवाडी गावचे पोलीस पाटील विलास येचकर, दौंड तालुका आरपीआय चे उपाध्यक्ष नवनाथ गायकवाड, नजर फाउंडेशनचे सचिव सचिन निंबाळकर ,एलआयसी एजंट राजू जाधव उपस्थित होते.

Previous articleदौंड येथे पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा : भारतीय पत्रकार संघाकडून रुग्णांना फळे वाटप
Next articleभारतीय पत्रकार संघाच्या वतीने दौंड येथे पत्रकार दिन साजरा