स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कारवाई, नवीन वर्षाच्या प्रारंभी जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस

उरुळी कांचन

सुजराम  करणराम पुरोहित (वय ३० वर्षे, रा.नसरापूर ,ता. भोर) हे आपला टेम्पो घेउन वेळू भागात थांबले असता, एक अनोळखी इसमाने नसरापूर येथुन काही लेबर आणायचे असून ते रांजे भोर येथे सोडायचे असा बहाना करून आणखी एका साथीदारासह टेम्पोत बसून निघाले, काही अंतर पुढे गेल्यानंतर टेम्पो चालकास टेम्पो बाजूला घेण्यास सांगून त्याचे गळ्याला ब्लेड लावून त्याला मारहाण करून जबरदस्तीने त्याचे ताब्यातील टेम्पो व मोबाईल, रोख रक्कम जबरीने चोरून घेऊन गेले होते. त्याबाबत राजगड पो स्टे येथे गु र न ४५०/२०२२ भा द वी ३९२,३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदरील गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करत असताना. सीसीटीव्ही फुटेज तसेच गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषण च्या आधारे सदरचा गुन्हा भोसरी येथील दत्ता नामदेव कांबळे यांनी केला असल्याचे निष्पन्न झाले होते. आरोपी दत्ता कांबळे यास ताब्यात घेऊन त्याचेकडे चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कबूल करून त्याचे सोबत आणखी एक साथीदार असल्याचे सांगितले आहे तसेच त्याच्याकडून गुन्हयातील चोरी केलेला टेम्पो, मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपी  दत्ता नामदेव कांबळे (वय ३८ वर्षे, रा.भोसरी पुणे) याला मुद्देमालासह पुढील तपासकामी राजगड पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.

सदर आरोपीविरुद्ध खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
दत्ता नामदेव कांबळे गुरनं ९७/ २००९ भादवी ३९२,३४. भोसरी पोलीस स्टेशन गुरनं १०२ / २००९ भादवी ३९२,३४. भोसरी पोलीस स्टेशन गुरनं १०३ / २००९ भादवी ३९२,३४. भोसरी पोलीस स्टेशन गुरनं १४८ / २०११ भादवी ३७९ . भोसरी पोलीस स्टेशन याप्रमाणे गुन्हे दाखल आहेत.

सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक अंकीत गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, पोलीस उपअधीक्षक धनंजय पाटील, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पो उप निरीक्षक शिवाजी ननवरे, पो हवा अजित भुजबळ, पो हवा राजू मोमीन, पो ना अमोल शेडगे, पो कॉ धिरज जाधव, पो कॉ दगडू विरकर यांनी केली आहे.

Previous articleउरुळी कांचन ग्रामस्वच्छता अभियान ग्रुपच्या ८ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
Next articleसंघटित , असंघटित , कंत्राटी कामगारांच्या स्वतंत्र बैठका घेऊ : कामगार मंत्री सुरेश खाडे यांचे भारतीय मजदूर संघाला आश्वासन