संघटित , असंघटित , कंत्राटी कामगारांच्या स्वतंत्र बैठका घेऊ : कामगार मंत्री सुरेश खाडे यांचे भारतीय मजदूर संघाला आश्वासन

कुरकुंभ , सुरेश बागल

२८ डिसेंबर रोजी भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय महामंत्री मा.रविंद्रजी हिंमते यांच्या नेतृत्वात नागपूर विधानसभेवर भव्य मोर्चा निघाला.ओरिसा पंजाब च्या धर्तीवर राज्यातील सर्व कंत्राटी कामगारांना कायम करा या व अन्य मागण्यांसाठी २८ डिसेंबर रोजी भारतीय मजदूर संघाचा २५००० पेक्षा जास्त कामगारांचा भव्य मोर्चा नागपूरच्या यशवंत स्टेडियमवरून विधानसभेवर निघाला होता.

कामगार मंत्री मा.ना.सुरेश खाडे यांनी निवेदन स्वीकारले भा.म संघाच्या शिष्ट मंडळात केंद्रीय उपाध्यक्षा नीता चौबे, विदर्भ प्रदेश अध्यक्षा शिल्पा देशपांडे, प्रदेश महामंत्री गजाननजी गटलेवार, कामगार महासंघाचे अध्यक्ष विठ्ठल भालेराव, पूर्व महामंत्री शंकरराव पहाडे व महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे प्रदेश महामंत्री सचिन मेंगाळे उपस्थित होते.

विदर्भासह पुणे, कोल्हापूर, सांगली, मुंबई, पनवेल, कोकण, जालना, विविध अन्य जिल्ह्यातून देखील महावितरण महापारेषण आणि महानिर्मिती या तिन्ही वीज कंपनीतील विविध नियमित मंजूर रिक्त पदाच्या जागेवर कार्यरत सुमारे ४००० वीज कंत्राटी कामगार या मोर्चात सामील झाले होते.

महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अधिकारी अभियंता संघर्ष समिती च्या एकूण ३० संघटना एकत्र येऊन ४ ते ६ जानेवारी संपावर जाण्याच्या तयारीत आहे मात्र सद्य स्थितीत राज्यातील १५,०००सदस्य असलेली महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ ही संघटना संपात सामील नाही.

विधानसभेत वीज कंत्राटी कामगारांना कायम करण्यासाठीच्या प्रश्नोत्तराच्या पार्श्वभूमीवर कंत्राटी कामगार संघाने देखील ऊर्जामंत्री शासन व प्रशासनास स्वतंत्र नोटीस दिली आहे. यावर शासन प्रशासन काय निर्णय घेते याकडे राज्यातील वीज कंत्राटी कामगारांचे लक्ष लागले आहे.

अनेक वर्षे कार्यरत अनुभवी वीज कंत्राटी कामगारांना कायम करा अथवा त्यांना रानडे समितीच्या रोजंदारी पद्धतीने वयाच्या ६० वर्षा पर्यंत शाश्वत रोजगार मिळावा यावर संघटना ठाम आहे . यावेळी विविध विषयांवर मान्यवरांचे मार्गदर्शन केले आहे. या वेळी भारतीय मजदूर संघ पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांचे अध्यक्ष निलेश खरात, कामगार महासंघाचे अध्यक्ष विठ्ठल भालेराव, अण्णाजी देसाई, ज्येष्ठ मार्गदर्शक वीज कंत्राटी कामगार संघ , शंकराराव पहाडे यांनी मार्गदर्शन केले आहे.

Previous articleस्थानिक गुन्हे शाखेची दमदार कारवाई, नवीन वर्षाच्या प्रारंभी जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस
Next articleक्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना वजीर सुळक्यावरून वंदन